Maharashtra@61 : प्रिय आमुचा…असा साजरा झाला होता पहिला महाराष्ट्र दिन, हा व्हिडीओ जरुर पाहा
सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र दिनाला राज्यावर कोरोनाचं सावट आहे. ६१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महाराष्ट्र राज्यात सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौकातील स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत महापौर किशोरी पेडणेकर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. […]
ADVERTISEMENT
सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र दिनाला राज्यावर कोरोनाचं सावट आहे. ६१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महाराष्ट्र राज्यात सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौकातील स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत महापौर किशोरी पेडणेकर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.
ADVERTISEMENT
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात १०५ जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. मुंबईतला कामगार वर्ग या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. प्रत्येक वर्षी आजच्या दिवशी या हुतात्म्यांचं स्मरण केलं जातं. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आला असला तरीही ६१ वर्षांपूर्वी राज्यात एक वेगळंच चित्र होतं. या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
Maharashtra Is a Tune. It Must Be Sung Together. Long Live Maharashtra….
Greetings to all on #MaharashtraDay..
Watch Maharashtra Day Celebrations on 1st May 1960. #महाराष्ट्रदिन pic.twitter.com/JiUfV7Jy11— Dayanand Kamble (@dayakamPR) May 1, 2021
मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते शिवनेरी गडावर झालेला सोहळा, शिवाजी पार्कच्या मैदानावर पंडीत नेहरुंची उपस्थिती, लता मंगेशकर यांनी गायलेलं बहु असोत सुंदर संपन्न…हे महाराष्ट्र गीत असे अनेक सोनेरी प्रसंग या व्हिडीओत पहायला मिळत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला राज्यातील जनतेशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाइव्हमध्ये महाराष्ट्र दिवसाबाबत काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये भाग घेऊन हाल अपेष्टा सोसून, त्याग करून ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्या सगळ्यांना मी नम्रपणे अभिवादन करतो. मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती यांच्याचमुळे हे विसरता येणार नाही. कामगार दिनही आहे. कामगार दिनाच्याही मी माझ्या सगळ्या कामगार बांधव आणि भगिनींना शुभेच्छा देतो आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याचं महत्त्व म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारही उतरले होते, संपूर्ण कामगार वर्ग उतरला होता. सगळे मराठी माता-भगिनी आणि बांधव उतरले होते.
ADVERTISEMENT
त्यांनी तो लढा दिला नसता तर मुंबई महाराष्ट्राला मिळाली नसती. त्यामुळे शेतकरी आणि कामगार या दोघांचं मोलाचं योगदान हे महाराष्ट्रासाठी आहे. गेल्यावर्षीचा 1 मेचा सोहळा साधेपणाने साजरा करावा लागला कारण लॉकडाऊनच होता. गेल्यावर्षी महाराष्ट्राला 60 वर्षे झाली, यावर्षी 61 वर्षे झाली मत्र दोन्ही वर्षांमध्ये कोरोनाचं सावट आपल्या राज्यावर आहेच.
ADVERTISEMENT
आजचा महाराष्ट्र दिवस हा उत्साहात किंवा उत्सवाच्या स्वरूपात आपण साजरा करू शकत नाही कारण एक खूप मोठं संकट आपल्यावर आहे.
मला आठवतोय तो 2010 चा सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र दिन. लाखो लोक जमले होते, बाळासाहेब ठाकरे होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. संपूर्ण मंगेशकर कुटुंब होतं. बहु असोत सुंदर हे गीत लतादीदींनी गायलं होतं. तो सुवर्णक्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. आत्ताचा जो काळ आहे तोही निघून जाईल आणि आपण महाराष्ट्र दिवस सोन्याच्या झळाळीने साजरा करू शकू असा मला विश्वास वाटतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT