मोदींविरुद्धचं ‘ते’ वक्तव्य नाना पटोलेंना भोवणार? कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले चौकशीचे आदेश

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील माझगाव मॅजिस्ट्रेट कोर्टाने भोईवाडा पोलीस ठाण्याला, नाना पटोलेंनी पंतप्रधान मोदींना कथित शिवीगाळ आणि मारण्याबद्दल केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 26 मे 2022 पर्यंत या प्रकरणाचा तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मॅजिस्ट्रेट कोर्टाने भोईवाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.

ADVERTISEMENT

2021 मध्ये नाना पटोले यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ते पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह भाषा आणि त्यांना मारण्याबद्दल बोलताना दिसत आहेत, ज्यावरुन राज्यात मोठा गदारोळ माजला होता. जाणून घ्या काय म्हणाले होते नाना पटोले…

“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षांपासून राजकारणात आहे. लोकं 5 वर्षात आपल्या इथे एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा-कॉलेज काढून आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एकही शाळा घेतली नाही, ठेकेदारी केली नाही. जो येतो त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो. त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्याविरोधात प्रचाराला आला. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे.”

पटोलेंच्या या वक्तव्यावरुन गदारोळ झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत, आपण भाषणात पंतप्रधान मोदींना उद्देशून बोलत नव्हतो तर त्यांच्या मतदारसंघातील एका मोदी नावाच्या गुंडाबद्दल बोलत होतो असं सांगितलं. कालांतराने हे प्रकरण शांत झालं असलं तरीही भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षाने पटोले यांची चौकशी केली जावी यासाठी कोर्टात धाव घेतली होती. आपल्या वकीलांमार्फत तक्रारदाराने कोर्टासमोर पटोले हे आपल्या भाषणांमधून काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. यावेळी तक्रारदाराने पटोले यांनी केलेल्या, ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं या वक्तव्याचाही दाखला दिला.

हे वाचलं का?

माझ्यासाठी भोंगे नाही तर महागाई आणि सामान्यांना भेडसावणारे प्रश्न महत्त्वाचे-सुप्रिया सुळे

नाना पटोले यांनी 153 B, 500, 504, 505 (2), 506 कलमाअंतर्गत गुन्हा केल्याचा दावा तक्रारदाराच्या वकिलांनी केला. नाना पटोलेंच्या वकीलांनीही कोर्टात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतू मॅजिस्ट्रेट पी.आय.मोकाशी यांनी नाना पटोले यांची बाजू मांडण्याचा तुमच्याकडे अद्याप अधिकृत हक्क आलेला नसल्यामुळे तुमचा युक्तीवाद विचारात घेतला जाणार नाही असं स्पष्ट केलं. यावेळी बोलत असताना मॅजिस्ट्रेट मोकाशी यांनी, जोपर्यंत आरोपीला नोटीस किंवा समन्स बजावलं जात नाही तोपर्यंत त्याची बाजू कोर्टासमोर ऐकता येत नाही हे देखील स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

मातोश्रीची लाईट बंद केल्याशिवाय यांना करंट बसणार नाही – मेघना बोर्डीकरांचा सरकारवर हल्लाबोल

ADVERTISEMENT

नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याचे रहिवासी आहेत. त्यामुळे या कोर्टाच्या कक्षेत हा भाग येत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास CrPC च्या सेक्शन 202 प्रमाणे होणं गरजेचं आहे, असं कोर्टाने स्पष्ट केलं. CrPC च्या सेक्शन 202 प्रमाणे दंडाधिकारी एखाद्या प्रकरणाची चौकशी पुढे ढकलू शकतो, किंवा त्या प्रकरणात तपास करण्यासाठी पुढे जाता येईल असं वाटल्यास स्वतः किंवा पोलीस अधिकाऱ्यामार्फत त्याची चौकशी करु शकतो. यानुसारच मॅजिस्ट्रेट कोर्टाने पटोले यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

भाजपच्या पोलखोल यात्रेवर दगडफेक, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT