Bhushan Desai: ‘या’ प्रकरणामुळे सुभाष देसाईंचे पुत्र शिंदे गटात?

Abhinn Kumar

मुंबई: शिवसेना (Shiv Sena) UBT पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी आज (13 मार्च) शिवसेना (शिंदे गटात) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. मात्र, असं असताना आता एक चर्चा अशीही सुरू झाली आहे की, भूषण देसाई यांनी एका प्रकरणामुळे दबावापोटी शिंदे गटात प्रवेश केल आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: शिवसेना (Shiv Sena) UBT पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी आज (13 मार्च) शिवसेना (शिंदे गटात) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. मात्र, असं असताना आता एक चर्चा अशीही सुरू झाली आहे की, भूषण देसाई यांनी एका प्रकरणामुळे दबावापोटी शिंदे गटात प्रवेश केल आहे. याबाबत भूषण देसाई यांना पत्रकार परिषदेत प्रश्नही विचारण्यात आला. ज्यावर भूषण देसाईंनी उत्तरही दिलं. पण ते उत्तर जाणून घेण्याआधी आपण भूषण देसाईंबाबतचं नेमकं प्रकरण काय ते सविस्तरपणे समजून घेऊया. (which case against subhash desai son bhushan desai was discussed in vidhansabha what is the connection with shiv sena party entry)

Bhushan Desai: ‘एक चूक महागात पडू शकते’, भाजप नेत्याचं शिंदेंना पत्र

भूषण देसाईंवर करण्यात आलेले गंभीर आरोप

राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी भूषण देसाईंवर गंभीर आरोप केले होते. ते नेमके आरोप काय ते जाणून घ्या.

विधानसभेत अतुल भातखळकरांनी भूषण देसाईंवर आरोप करताना म्हटलं होतं की, ‘MIDC ची कुठलीही जागा जी मूलत: उद्योगासाठी राखीव असते ती थेट रहिवाशी क्षेत्रात परावर्तित करता येत नाही. उद्योगाआधी तुम्हाला जागा कमर्शिअल करावी लागते आमि मग रहिवासी. पण अडीच वर्षाच्या कालखंडात MIDC महाराष्ट्रातील 4 लाख 14 हजार स्क्वेअर मी. एवढी जागा जी औद्योगिक कारणाकरिता राखीव होती ती जागा थेट बेकायदेशीर पद्धतीने रहिवासी वापराकरिता परावर्तित केली. या जागेची मार्केट व्हॅल्यू 3 हजार 190 कोटी आहे. पण कायदा पायदळी तुडवून जमिनीच्या आरक्षणात बदल केला.’ असं म्हणत भातखळकर यांनी काही सवालही उपस्थित केले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp