विधान परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर, फडणवीसांनी MVA ला पुन्हा चारली धूळ!

मुंबई तक

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. या निवडणुकीत भाजपने 5 उमेदवार उभे केले होते. हे पाचही उमेदवार निवडून आणण्यात भाजपला यश आलं आहे. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. मात्र, असं असतानाही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय अचूक अशी रणनिती आखली आणि योग्य वेळी महाविकास आघाडी सरकारचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. या निवडणुकीत भाजपने 5 उमेदवार उभे केले होते. हे पाचही उमेदवार निवडून आणण्यात भाजपला यश आलं आहे. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. मात्र, असं असतानाही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय अचूक अशी रणनिती आखली आणि योग्य वेळी महाविकास आघाडी सरकारचा गेम केला. या निवडणुकीसाठी भाजपकडे फक्त चार उमेदवार निवडून येतील एवढेच अधिकृत मतदार होते. पण तरीही पाचव्या जागेसाठी प्रसाद लाड यांना उतरविण्यात आलं आणि एकही मत हाती नसतानाही भाजपने आपले पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना निवडून आणलं.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांनी 26 मतांचा कोटा पूर्ण करुन अनपेक्षितरित्या विजय मिळवला आहे. तर काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरो यांचा अत्यंत धक्कादायक पद्धतीने पराभव झाला.

या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे शेवटच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे या दोन उमेदवारांमध्येच अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांना पहिल्या पसंतीची 22 तर भाई जगताप यांना 19 मतं मिळाली आहेत. यामुळे पहिल्या फेरीत काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे शेवटच्या फेरीत काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढाई पाहायला मिळत आहे.

राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच फडणवीसांचा महाविकास आघाडीला दे धक्का..

हे वाचलं का?

    follow whatsapp