ऐकावं ते नवलच ! ड्रायव्हर दारु पिण्यासाठी गेल्यामुळे पॅसेंजर ट्रेन एक तास उशीरा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आतापर्यंत रेल्वेने प्रवास करत असताना अनेकदा ट्रेन लेट झाल्याच्या घटना आपण प्रत्येकाने अनुभवल्या असतील. परंतू बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. गाडीचा ड्रायव्हर दारु पिण्यासाठी गेल्यामुळे पॅसेंजर ट्रेन एक तासाने लेट झाली.

ADVERTISEMENT

समस्तीपूर ते सहरसा दरम्यान जाणारी पॅसेंजर ट्रेन हंसपूर रेल्वे स्थानकात थांबली. समोरुन येणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला जागा देण्यासाठी ही पॅसेंजर ट्रेन थांबवण्यात आली. यावेळी गाडीचा असिस्टंट लोको पायलट, कर्णवीर यादव हा पॅसेंजर ट्रेनमधून अचानक गायब झाला. यानंतर पॅसेंजर ट्रेनला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतरही गाडी पुढे सरकलीच नाही.

हिरवा सिग्नल मिळाल्यानंतरही गाडी पुढे जात नसल्यामुळे स्टेशन मास्तर चौकशीसाठी बाहेर आले. तसेच प्रवाशांमध्येही चलबिचल सुरु झाली. रेल्वे पोलिसांनी असिस्टंट लोको पायलट कर्णवीर यादव यांचा शोध घेतला असता ते स्थानिक मार्केटमध्ये नशेच्या अवस्थेत आढळले.

हे वाचलं का?

यादव यांनी इतकं मद्यपान केलं होतं की त्यांना त्यांच्या पायावर धड उभं राहता येत नव्हतं. ज्यानंतर रेल्वे पोलिसांनी यादव यांना अटक केली आहे. या प्रकरणात डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर अलोक अग्रवाल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT