बिपाशा बसूच्या घरी आली चिमुकली पाहुणी, करण बिपाशा झाले आई-बाबा
Bipasha Basu-Karan Singh Grover Welcomes Baby Girl: बिपाशा बसू आणि करण ग्रोव्हर हे सेलिब्रिटी कपल आता आई-बाबा झालं आहे. कारण बिपाशा बसूने एका मुलीला जन्म दिला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार ४३ वर्षांच्या बिपाशाने मुलीला जन्म दिला आहे. रणबीर आणि आलिया यांच्या घरीही मुलीचं आगमन झालं. त्यानंतर आता बिपाशानेही मुलीला जन्म दिला आहे. बॉलिवूडचं हे कपल […]
ADVERTISEMENT
Bipasha Basu-Karan Singh Grover Welcomes Baby Girl: बिपाशा बसू आणि करण ग्रोव्हर हे सेलिब्रिटी कपल आता आई-बाबा झालं आहे. कारण बिपाशा बसूने एका मुलीला जन्म दिला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार ४३ वर्षांच्या बिपाशाने मुलीला जन्म दिला आहे. रणबीर आणि आलिया यांच्या घरीही मुलीचं आगमन झालं. त्यानंतर आता बिपाशानेही मुलीला जन्म दिला आहे. बॉलिवूडचं हे कपल आता पॅरेंट क्लबमध्ये सहभागी झालं आहे.
ADVERTISEMENT
बिपाशाने दिला लहान मुलीला जन्म
बिपाशा बसुच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार अॅक्ट्रेसने एका लहान मुलीला जन्म दिला आहे. बिपाशाला मुलगी झाल्याची बातमी समोर येताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे. या प्रसंगी अनेकजण या कपलचं अभिनंदन करत आहेत. त्यांना शुभेच्छा देत आहेत.
बिपाशा बसुने गेल्या काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडियावर विविध आउटफिटमध्ये मॅटर्निटी फोटोशूट शेअर केले आहे. प्रेग्नन्सी काळातही बिपाशाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. विविध फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा नवरा करणही पाहायला मिळाला. त्यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना आवडत असून आता या बातमीनंतर जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हे वाचलं का?
१६ ऑगस्ट रोजी अभिनेत्रीने एक मॅटर्निटी फोटोशूट शेअर करत तिच्या प्रेग्नन्सीविषयी माहिती दिली होती. या पोस्टमध्ये करण आणि बिपाशाने त्यांना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले होते. त्यांच्या या पोस्टवरही चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या होत्या. एप्रिल २०१६ साली हे जोडपे विवाहबंधनात अडकले होते. २०१५ साली ‘अलोन’ या सिनेमाच्या सेटवर त्यांची भेट झाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT