रुग्णालयात धुडगूस घालणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला पोलिसांकडून अमानुष मारहाण, Video व्हायरल
जालना: जालन्यात एका भाजप कार्यकर्त्यांला पोलिसांनी निर्दयीपणे मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला असून आता याप्रकरणी भाजप नेते फारच आक्रमक झाले आहे. संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी केली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीचा व्हीडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत असल्याने आता प्रशासनाकडून संबंधित पोलिसांवर काही कारवाई केली […]
ADVERTISEMENT

जालना: जालन्यात एका भाजप कार्यकर्त्यांला पोलिसांनी निर्दयीपणे मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला असून आता याप्रकरणी भाजप नेते फारच आक्रमक झाले आहे. संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी केली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीचा व्हीडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत असल्याने आता प्रशासनाकडून संबंधित पोलिसांवर काही कारवाई केली जाणार का? असा सवाल विचारला जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथे 9 मे रोजी जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात एका तरुण रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी डॉक्टरांनी योग्य उपचार केले नसल्याचा आरोप करत काही युवकांनी दवखान्यात धुडगूस घातला होता. यात भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाले हा देखील सहभागी होता.
जेव्हा रुग्णालयात कार्यकर्त्यांचा धुडगूस सुरु होता त्याचवेळी पोलीस तिथे दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी शिवराज नारियलवाले या कार्यकत्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, ही मारहाण एवढी अमानुष होती की, ज्यामध्ये हा तरुण गंभीरपणे जखमी झाला आहे. दरम्यान, यावेळी हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात शूट झाल्याने आता त्याचा व्हीडिओ व्हायरल होऊ लागला आहे.