MLC Election : विधानसभेला डावललेल्या बावनकुळेंना तिकीट; भाजपाचे 5 उमेदवार जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपने आपली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी कोल्हापुरातून सतेज पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बाकीचे पक्ष कोणाला संधी देतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. भाजपने आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

ADVERTISEMENT

या यादीत विधानसभा निवडणूकीत तिकीट नाकारलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी बावनकुळेंना तिकीट नाकारण्यात आल्यामुळे राज्यात चर्चेला उधाण आलं होतं. परंतू पक्षातलं प्रमुख ओबीसी नेतृत्व आणि आगामी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंना यंदा संधी देण्यात आलेली असल्याचं म्हटलंय.

याव्यतिरीक्त कोल्हापूरात सतेज पाटलांविरुद्ध पारंपरिक प्रतिस्पर्धी अमल महाडीक, धुळ्यावरुन अमरीश पटेल, अकोल्यासह बुलढाणा आणि वाशिम मधून वसंत खंडेलवाल तर मुंबईतून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा विचार करुन उत्तर भारतीय मतांचा विचार करुन मुंबईतून राजहंस सिंह यांना संधी देण्यात आल्याचं बोललं जातंय.

हे वाचलं का?

विधान परिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या ६ सदस्यांपैकी रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप यांच्या सदस्य पदाचा कार्यकाळ १ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे.

Maharashtra MLC Election : आदित्य ठाकरेंसाठी ‘वरळी’ सोडणाऱ्या शिंदेना शिवसेनेकडून ‘गिफ्ट’; रामदास कदमांचा पत्ता कट

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी जाहीर केला. 16 नोव्हेंबरला निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. नामनिर्देशन दाखल करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर असून, 24 नोव्हेंबरला दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर असून, 10 डिसेंबरला मतदान आणि 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT