Sachin Vaze प्रकरणात अजित पवार-अनिल परब यांची CBI चौकशी करा, भाजपचं अमित शाह यांना पत्र
सचिन वाझे प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा अशी मागणी आता भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे निवेदन असलेले पत्र अमित शाह यांना पाठवलं आहे. सीबीआयतर्फे सखोल चौकशी करा अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेश कार्य समितीने या […]
ADVERTISEMENT
सचिन वाझे प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा अशी मागणी आता भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे निवेदन असलेले पत्र अमित शाह यांना पाठवलं आहे. सीबीआयतर्फे सखोल चौकशी करा अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेश कार्य समितीने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मंजूर केला होता. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यासंदर्भातलं पत्र पाठवलं आहे. भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करतो आहोत असाही दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
सचिन वाझेने 3 एप्रिलला काय म्हटलं होतं पत्रात?
अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेने 3 एप्रिलला कोर्टाला एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र स्वीकारण्यास कोर्टाने नकार दिला. कन्फेशन देण्याची एक प्रक्रिया असते. त्यानुसार तुम्ही कोर्टाने गेलं पाहिजे असं कोर्टाने म्हटलं होतं. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्यासोबत अनिल परब आणि अजित पवार यांच्यावरही आरोप केले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये दर्शन घोडावत नावाच्या माणसाने मला संपर्क साधला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मी निकटवर्तीय आहे अशी त्याने ओळख करून दिली होती. दर्शन घोडावत यांनी मला महाराष्ट्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा आणि तंबाखू व्यापारी यांची माहिती दिली. सोबत काही फोन नंबर्सही पुरवले. दर्शन घोडावत यांनी मला आग्रह केला की या बेकायदा गुटखा व्यापाऱ्यांकडून मी महिन्याला 100 कोटी रूपये जमा करावेत असं सचिन वाझेंनी पत्रात म्हटलं आहे.
हे वाचलं का?
जुलै 2020 या महिन्यात मला अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावलं. त्या आठवड्यातच डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदं पुनर्गठीत करण्यात आली होती. त्यावेळी मला Saifee Burhani Upliftment Trust यांच्या तक्रारींमध्ये लक्ष घालण्यास सांगितलं. त्यानंतर SBUT च्या विश्वस्तांना निगोसिएशन्ससाठी बोलवण्यास सांगितलं. प्राथमिक चर्चेला येतानाच त्यांनी 50 कोटी रूपये आणावेत जेणेकरून त्यांच्याविरोधातल्या तक्रारींची फाईल बंद करता येईल. SBUT च्या कुठल्याही सदस्याला मी ओळखत नसल्याचं मी अनिल परब यांना सांगितलं असंही सचिन वाझेने त्याच्या पत्रात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT