पूजा चव्हाण मृत्यू : अत्यंत दुर्दैवी; संजय राठोडांची मंत्रिमंडळात वर्णी, चित्रा वाघ भडकल्या

मुंबई तक

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी झाला. एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात शिंदे गटाकडून संजय राठोड यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता भाजपमधूनच त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी संजय राठोडांवर निशाणा साधला आहे. संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी झाला. एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात शिंदे गटाकडून संजय राठोड यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता भाजपमधूनच त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी संजय राठोडांवर निशाणा साधला आहे.

संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चित्रा वाघांनी काय दिला इशारा?

पूजा चव्हाणच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ या सुरुवातीपासून करत आहेत. हा विषय वाघ यांनी जोरात लावून धरला होता. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा संजय राठोड यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांनी यावर आक्षेप घेतला आहे आणि आपला संजय राठोड यांच्या विरोधातील लढा सुरुचं ठेवणार असल्याचं सांगितलं आहे.

चित्र वाघ यांची फेसबुक पोस्ट

चित्र वाघ यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून भूमिका स्पष्ट केली आहे. त्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, ‘पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे….जितेंगे. अशी फेसबुक पोस्ट चित्र वाघ यांनी लिहली आहे. त्यामुळे चित्र वाघ या पुढील काळात संजय राठोड यांच्या विरोधात काय पाऊल उचलतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.