केतकी चितळेला शिवीगाळ, जीवे मारायची धमकी देणाऱ्यांवरही कारवाई करा – चित्रा वाघ यांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीने पोस्ट केलेल्या कवितेवर सोशल मीडियातून आणि राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी केतकीच्या पोस्टचा निषेध केला असला तरीही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक महत्वाची मागणी केली आहे. न्यायालयाने केतकी चितळेला […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीने पोस्ट केलेल्या कवितेवर सोशल मीडियातून आणि राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी केतकीच्या पोस्टचा निषेध केला असला तरीही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक महत्वाची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
न्यायालयाने केतकी चितळेला कोठडी सुनावल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केतकी चितळेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिला शिवीगाळ करणाऱ्या, तिला चोपायची-जीवे मारायची धमकी देणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी वाघ यांनी केली आहे.
केतकी चितळे प्रकरण: सुप्रिया सुळे यांनी फडणवीस-राज ठाकरेंचे का मानले जाहीर आभार?
हे वाचलं का?
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर केतकीवर अश्लाघ्य शब्दांत टीका करणाऱ्या युजर्सचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.
केतकी चितळे वर कारवाई झाली
आता
त्याच बरोबर केतकी चितळेला अतिशय अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ..उघड उघड चोपायची/ जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रणरागिणींवर देखील रितसर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी.कायदा सर्वांना समान असतो,असं म्हणतात.@DGPMaharashtra @MahaCyber1 pic.twitter.com/HJV2QGvtSq
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 15, 2022
नेमकं काय आहे प्रकरण? –
ADVERTISEMENT
केतकी चितळेने भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट आपल्या सोशल मीडियावरून शेअर केली. त्यामधून शरद पवारांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जवळपास १० पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. ठाणे पोलिसांनी शनिवारी केतकीला अटक केली होती. यावेळी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर अंडी आणि शाईफेक केली होती. तसेच तिला आमच्या ताब्यात द्या आम्ही तिला धडा शिकवतो, अशा धमक्या देखील दिल्या होत्या. इतकंच नाहीतर सोशल मीडियावरून देखील केतकीवर टीका करण्यात आली. पोलिसांनी आज केतकीला न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने तिला १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
शरद पवारांच्या ‘त्या’ पोस्टबाबत केतकी चितळेचं कोर्टात मोठं विधान, म्हणाली..
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT