गुवाहाटीचं तिकीट जाधवांना हवं होतं पण…; निलेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच नवीन नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये आमदार भास्कर जाधव, खासदार अरविंद सावंत यांना नेतेल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी शिंदे गट आणि कोर्टाच्या सुनावणीवरती भाष्य केले. त्याचबरोबर त्यांनी भारत गोगावलेंच्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला. आता याच टीकेवरती माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधवांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच नवीन नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये आमदार भास्कर जाधव, खासदार अरविंद सावंत यांना नेतेल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी शिंदे गट आणि कोर्टाच्या सुनावणीवरती भाष्य केले. त्याचबरोबर त्यांनी भारत गोगावलेंच्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला. आता याच टीकेवरती माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधवांना डिवचले आहे.

निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले?

भास्कर जाधवांना प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांनी ट्विट केले आहे. ”भास्कर जाधव यांचं ठाकरे प्रेम वाहू लागलंय, गुवाहाटीची तिकीट जाधवांना पण हवी होती पण ती का मिळाली नाही आम्हाला चांगलं माहित आहे म्हणून जास्त उडू नका.” अशा आशयाचं ट्विट राणेंनी केलं आहे.

एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळेस भास्कर जाधव ही तयारीत होते परंतु त्यांना जमलं नाही असं राणे म्हणाले, राणेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यावरती भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया आलेली नाही.

भास्कर जाधव आपल्या वक्तव्यामध्ये काय म्हणाले होते?

राजापूरमधील रिफायनरीबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रव्यवहार केल्याचं भाजप आधीपासूनच म्हणत आहे, त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आता भाजपची असल्याचं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं होतं. शिवसेनेची बदनामी करण्यासाठी भाजप नेहमी खोटं बोलत आलं आहे….त्यामुळे एकदा लोकांसमोर येऊन या प्रकल्पाच्या गुंतवणूकीबद्दल लोकांना खरं सांगावं आणि हा प्रकल्प उभा करावा असंही भास्कर जाधवांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp