‘बाकीच्या कारखान्यांना मदत, माझ्या…’, पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील खदखद

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp leader Pankaja Munde gst department action against vaidyanath sugar factory 19 crore gst overpayment
bjp leader Pankaja Munde gst department action against vaidyanath sugar factory 19 crore gst overpayment
social share
google news

Pankaja Munde : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काही दिवसापूर्वी शिवशक्ती परिक्रमा यात्रा (Shivshakti Parikrma Yatra) काढली होती. त्या यात्रेला मोठा प्रतिसाद पंकजा मुंडेना मिळाला होता. त्यानंतर पंकजाताईंच्या वैद्यनाथ साखर (Vaidyanath Sugar Factory) कारखान्यावर जीएसटी (JST) विभागाने कारवाई केली. ही कारवाई का करण्यात आली, त्यावरुन आता जोरदार चर्चा रंगल्या आहेत. त्याचवेळी जीएसटी विभागाच्या कारवाईनंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधत माझा कारखाना अडचणीत असल्याचे सांगत राजकारणातून ही कारवाई झाली आहे का यावर बोलताना त्यांनी मी राजकारणातून आणि संघर्षातून मार्ग काढणार असल्याचे सांगत चुकीच्या गोष्टी करणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (bjp leader Pankaja Munde gst department action against vaidyanath sugar factory 19 crore gst overpayment)

ADVERTISEMENT

आकडे व्याजाचे

शिवशक्ती परिक्रमा यात्रेनंतर पंकजाताईंच्या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटीकडून कारवाई झाल्यामुळेच तो चर्चेचा विषय ठरला आहे. कारखान्याच्या कारवाईनंतर जे आकडे सांगितले जात आहेत. ते पैशाचे सगळे आकडे हे व्याजाचे आकडे असल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

हे ही वाचा >> NCP Split : ‘या’ निकषावर ठरणार राष्ट्रवादी कुणाची? प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान

मला सोडून इतरांना मदत

वैद्यनाथ साखर कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना दिल्या गेल्यामुळे आता कारवाई कशा पद्धतीने होणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या कारवाईबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या की, कारखान्याबाबत चुकीच्या पद्धतीने काहीही जाले नाही. बँकेकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांचे पैसे अदा केले आहेत. कारखान्याच्या मदतीसाठी मी केंद्राकडेही मदत मागितली होती. मात्र मला सोडून राज्यातील इतर कारखान्यांना मदत दिली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

राजकारणावर बोलणार नाही

भाजपमधून तुम्हाला डावलले जात आहे का ? असा सवाल पत्रकारांनी विचारल्यानंतर मात्र त्यांनी त्यावर बोलण्याचे टाळले आहे. याबाबत मी काहीही सांगू शकत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ कारखान्याबाबत बोलताना सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांचा कारखाना हलाखीत उभा केला आहे. कोविडमध्ये नाकातोंडात पाणी गेले असल्यामुळेच तेव्हा बँकेकडे गेले होते.

हे ही वाचा >> पंकजा मुंडेंसाठी सुप्रिया सुळे सरसावल्या; अमित शाहांवर ‘बाण’, काय म्हणाल्या?

लोकांसाठी राजकारण

माझ्या कारखान्यातून आणि माझ्या राजकारणातून संघर्षातून मार्ग काढेन तसेच चुकीच्या गोष्टी करणार नसून लोकांसाठी राजकारण करत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कारवाईनंतर पंकजाताई मुंडे यांनी बोलताना सांगितले की, मी फक्त संघर्षकन्या नाही तर सहनशीलता कन्या आहे. यातूनही मी मार्ग काढणार असल्याचे सांगत त्यांनी राजकारणावर बोलणं मात्र टाळलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT