सर्वज्ञानींच्या झंजावाती दौऱ्यांचा परिणाम! निकालांवर चित्रा वाघ यांचा राऊतांना खोचक टोला
गोवा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. काँग्रेसची कडवी झुंज मोडून काढत भाजपने पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवण्यात यश मिळवलं आहे. या विजयानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. सर्वज्ञानींच्या झंजावाती दौऱ्याचा परिणाम – शिवसेनेच्या गोवा, युपी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना […]
ADVERTISEMENT

गोवा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. काँग्रेसची कडवी झुंज मोडून काढत भाजपने पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवण्यात यश मिळवलं आहे. या विजयानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
सर्वज्ञानींच्या झंजावाती दौऱ्याचा परिणाम – शिवसेनेच्या गोवा, युपी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे. झुकेगा नही…जब तक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ़ नहीं करतां -इति सर्वज्ञानी असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौर्यांचा परीणाम-
शिवसेनेच्या गोवा युपी सगळ्या उमेदवारांचं डिपॉझीट जप्त होतांना दिसत आहे….झुकेगा नही ….जब तक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ़ नहीं करतां –
इति सर्वज्ञानी@rautsanjay61 @Dev_Fadnavis #ElectionResults2022— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 10, 2022
भाजपची सरशी होणारचं होती…
भाजपने देशभरात जनतेला विकासासोबतचं विश्वास ही दिला
पण
इथे मात्र नेहमीप्रमाणे विरोधकांची #EVM च्या नावाने रडायला सुरूवात झालीये#कधीसुधारणार— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 10, 2022
याचसोबत एकटे देवेंद्र फडणवीस काय करणार असं विचारणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
अकेला देवेंद्र क्या करेगा पुछनेवालों को..
फिर एक बार करारा जवाब…
यह तो सिर्फ अंगडाई है….अब महाराष्ट्र कि बारी है….
जय हो…..विजय हो…??@Dev_Fadnavis @CTRavi_BJP @DrPramodPSawant @ChDadaPatil @BJP4Goa @BJP4Maharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 10, 2022
चित्रा वाघ यांच्यासोबत भाजप आमदार नितेश राणे यांनीही आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.