शिवाजीराव आढळराव पाटलांचं गणित चुकलं, आता भाजप करणार ‘करेक्ट कार्यक्रम’?
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. राज्यात ठाकरे सरकार आलं, पण या नव्या सरकारमुळे शिवसेनेत सर्वाधिक अडचण झाली, ती शिवाजीराव आढळराव पाटलांची! राष्ट्रवादीमुळे आढळरावांचा शिरूर लोकसभा मतदारसंघावरचा दावा कमजोर झाला होता. त्यामुळे शिवसेनेतल्या फाटाफुटीत सुरवातीला तळ्यात-मळ्यात करत आढळरावांनी शिंदे गटात उडी मारली. भाजपसोबत काम सुरू केलं. नव्या जोमाने कामाला लागले. अशातच आता […]
ADVERTISEMENT
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. राज्यात ठाकरे सरकार आलं, पण या नव्या सरकारमुळे शिवसेनेत सर्वाधिक अडचण झाली, ती शिवाजीराव आढळराव पाटलांची!
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीमुळे आढळरावांचा शिरूर लोकसभा मतदारसंघावरचा दावा कमजोर झाला होता. त्यामुळे शिवसेनेतल्या फाटाफुटीत सुरवातीला तळ्यात-मळ्यात करत आढळरावांनी शिंदे गटात उडी मारली. भाजपसोबत काम सुरू केलं. नव्या जोमाने कामाला लागले. अशातच आता शिंदे गटात जाऊनही आढळरावांचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. आणि याला कारण ठरलंय, ते भाजपचं मिशन २०२४.
भाजपच्या ‘मिशन १४४’ मध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांचा मतदारसंघ
भाजपनं दोन वर्षाआधीच लोकसभा २०२४ चं मिशन हाती घेतलंय. त्यासाठी जोरदार तयारी केली जातेय. केंद्रीय मंत्री पाठवून भाजपेत्तर खासदार असलेल्या मतदारसंघात आव्हान उभं केलं जातंय. शिंदे गटाचे खासदार असलेल्या मतदारसंघातही भाजपचे मंत्री मुक्काम ठोकत आहेत. शिरूरची जबाबदारी केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांच्या खांद्यावर देण्यात आलीय.
हे वाचलं का?
Shiv Sena : उद्धव ठाकरेंना भिडणाऱ्या संजय शिरसाटांना एकनाथ शिंदेंनी पुन्हा डिवचलं?
शिरुरमधून खासदार काम करणारा असावा आणि तो भाजपचा असावा, असं म्हणत रेणुका सिंग यांनी आढळरावांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. पत्रकारांशी बोलताना रेणुका सिंग म्हणाल्या, ‘शिरुर मतदारसंघात भाजपची ताकद वाढावी यासाठी केंद्रीय नेतृत्वाने आपल्यावर जबादारी दिलीये.
ADVERTISEMENT
स्थानिक माजी खासदार कोणत्या गटाचा किंवा कोणत्या पक्षाचा याबाबत आपल्याला काही म्हणालचं नाही. ते आमच्या सोबत युतीत होते, पण तरीही आता दिवस बदललेत. आम्ही आमची ताकद अजमावणार आहोत. राष्ट्रवादीची कथणी आणि करणी वेगळी आहे. त्यामुळे यापुढचा खासदार काम करणारा असावा आणि भाजपचा असावा.’
ADVERTISEMENT
कोकणात नेमका ‘आवाज कुणाचा’? : शिंदे गटाने केली आदित्य ठाकरेंना उत्तर देण्याची तयारी
शिरुर लोकसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ उमेदवार?
दोन दिवसांपूर्वीच शिरुर लोकसभा निवडणूक प्रभारी आणि भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनीही काहीसं असं विधान केलं होतं. 2024 च्या निवडणुकीत शिरूरमध्ये भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
भाजपच्या याच विस्तार नितीमुळे मविआत राष्ट्रवादीमुळे आपला पत्ता कट होईल, असं वाटणाऱ्या आढळरावांचं शिंदे गटातही जाऊन गणित चुकलं का, अशा चर्चा शिरूरमध्ये सुरू झाल्यात. कारण भाजप-शिवसेना युतीत 2009 पासून शिरूर मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. सलग 2 वेळा आढळराव पाटील इथून विजयी झालेत. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळरावांना मात दिली.
Shiv Sena: …तरीही दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, विनायक राऊतांनी क्लिअर सांगितलं
शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे एकमेकांचं कट्टर स्पर्धक झाले. पण मविआच्या प्रयोगाने आढळरावांची मोठी कोंडी झाली. आढळरावांच्या राजकीय भवितव्याच धोक्यात आलं. त्याचवेळी शिंदेंनी बंड केल्यानं नवी आशा निर्माण झाली. मात्र आता भाजपच्या विस्तार नितीमुळे आढळरावांसाठी इकडे आड तिकडे विहिरी अशी आगीतून फुफाट्यात अवस्था झालीय का, असा प्रश्न सद्यस्थिती निर्माण झालाय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT