BJP आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात, गाडी पुलावरुन 30 फूट खाली कोसळली
सातारा: साताऱ्यातील (Satara) माणचे भाजप आमदार (BJP MLA) जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या गाडीला फलटणजवळ पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात (accident) झाल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. त्यांची गाडी पुलावरुन तब्बल 30 फूट खोल पडली असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. या अपघातात जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली असल्याचंही समजतं आहे. […]
ADVERTISEMENT
सातारा: साताऱ्यातील (Satara) माणचे भाजप आमदार (BJP MLA) जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या गाडीला फलटणजवळ पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात (accident) झाल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. त्यांची गाडी पुलावरुन तब्बल 30 फूट खोल पडली असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. या अपघातात जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली असल्याचंही समजतं आहे. (bjp mla jayakumar gores tragic accident car falls 30 feet from the bridge satara)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजून 30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. आमदार गोरे यांच्या फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, जिथे झालं उद्घाटन तिथंच घडली घटना
हे वाचलं का?
ज्यावेळी गाडीला अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह एकूण चार जण प्रवास करत होते. अपघातात या चारही जण जखमी झाले आहेत. आमदार गोरे यांच्या बरगड्यांना फ्रॅक्चर झालं असून त्यांना सध्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर गाडीमधील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असणाऱ्या दोघांना उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
पुण्याहून आपल्या गावी म्हणजेच दहीवडीकडे जात असताना गोरे यांच्या गाडीला हा अपघात झाला. चालकाचं अचानक गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुलावरील संरक्षक कठड्याला धडक देऊन गाडी थेट 30 फूट खाली कोसळली, सुदैवाने पुलाखाली फारसे पाणी नसल्याने मोठी दुर्घटना यावेळी टळली.
ADVERTISEMENT
दरम्यान, या अपघाताचे वृत्त समजताच गोरे यांच्या मतदारसंघात बरीच घबराट पसरली. मात्र, आमदार गोरे सुखरुप असल्याचे समजातच त्यांच्या कुटुंबीयांसह मतदारसंघातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सध्या आमदार गोरे यांच्यावर उपचार सुरु असून काही वेळातच डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत नेमकी माहिती देणार असल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलं.
पुणे : राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावर भीषण अपघात : 30 गाड्या एकमेकांवर आदळल्या
कोण आहेत आमदार जयकुमार गोरे?
-
आमदार जयकुमार गोरे हे साताऱ्यातील माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
-
सुरुवातीला अपक्ष नंतर काँग्रेस आणि आता भाजपमध्ये असलेले जयकुमार हे सातऱ्यातील बडं प्रस्थ असल्याचं बोललं जातं.
-
जयकुमार गोरे हे सर्वात आधी 2014 साली काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हापासून त्यांनी माण मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवली आहे.
-
2009 साली त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना अपयश आलं होतं. मात्र, 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून ते थेट विधानसभेत पोहचले होते.
-
मात्र, राज्यातील राजकीय वातावरण बदलल्याने 2019 विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीत देखील त्यांना पुन्हा एकदा मतदारांनी भरघोस मतांनी विधानसभेत पाठवलं.
-
दरम्यान, जयकुमार गोरे यांचा मतदारसंघ हा कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात असल्याने आमदार गोरेची भूमिका ही महत्त्वाची ठरते.
-
काही महिन्यांपूर्वीच आमदार गोरेंसह पाच जणांवर फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील त्यांच्या गावी दाखल झाला होता. जमीन प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT