मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेआधी नितेश राणेंनी विचारले चार प्रश्न, म्हणाले…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज संध्याकाळी सभा घेणार आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी चार प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उपस्थित केले आहेत. एवढंच नाही तर जनतेच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहात की केंद्रावर जबाबदारी ढकलणार आहात? असंही म्हटलं आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदान या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. आता नितेश राणे यांनी […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज संध्याकाळी सभा घेणार आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी चार प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उपस्थित केले आहेत. एवढंच नाही तर जनतेच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहात की केंद्रावर जबाबदारी ढकलणार आहात? असंही म्हटलं आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदान या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. आता नितेश राणे यांनी चार प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय म्हटलं आहे नितेश राणे यांनी?
महाराष्ट्रातील हिंदूंना धमकी देणाऱ्या आणि औरंगजेबाचा उधोउधो करणाऱ्या ओवेसींवर गुन्हे दाखल करून अटक करणार का?
महाराष्ट्रात निर्माण झालेलं अतिरिक्त ऊसाचं गाळप करून उस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार की कारखानदारांचा बचाव करणार?
शेतकऱ्यांचा पीक विमा बुडवणाऱ्या पीक वीमा कंपन्यांवर कारवाई करणार का?
महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर मेगा नोकर भरतीची घोषणा ही फक्त बेरोजगार युवकांसाठी गाजर होती हे मान्य करणार का?
हे चार प्रश्न भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत. आता उद्धव ठाकरे हे या प्रश्नांना उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच दुसरीकडे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले आहेत.
काय आहेत अतुल भातखळकर यांनी विचारलेले प्रश्न
जी सभा तुम्ही घेणार आहात ती भक्त भाजप द्वेषाची गरळ ओकणारी सभा की जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणार?
उमर खलीद, शरजील उस्मानी आणि आता अकबरूद्दीन ओवेसी यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? उमर खलिदची दखल दिल्ली पोलिसांनी घेतली, अकबरूद्दीन ओवेसींवर गुन्हा दाखल करणार का?
पक्षप्रमुख म्हणून बोलणार की मुख्यमंत्री म्हणून बोलणार? मुख्यमंत्री म्हणून बोलणार असाल तर मुंबई मेट्रोचं काय झालं?
अजान स्पर्धा, टिपू सेना, उर्दू विशेष वर्ग हे सगळं हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतं का?
मागच्या अडीच वर्षात सामान्य नागरिकांसाठी काय केलं? हे सभेत सांगावं सभा घेतल्यानंतर आठवड्यातून चार वेळा तरी मंत्रालयात जाणार का?