शहाजीबापू हॉटेलमध्ये येताच भाजप आमदारांचा जल्लोष, धरले चंद्रकांतदादांचे पाय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर आपल्यासोबत ४०च्या वरती आमदार घेऊन अगोदर सुरतला गेले. सुरतवरुन एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाने आपला मुक्काम गुवाहटीला हलवला आणि दोन दिवसापासून सर्व आमदार गोव्यामध्ये होते. आज तब्बल १२ दिवसांनंतर सर्व आमदार मुंबईमध्ये आले आहेत. उद्या आणि परवा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे विशेष अधिवेशन होणार आहे. त्याठिकाणी बहुमत चाचणी होणार आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान सर्व बंडखोर आमदार हॉटेलमध्ये येताच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यामध्ये सर्वात चर्चेचा विषय राहिला तो शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचा. शहाजीबापू हॉटेलमध्ये येताच भाजपच्या सर्व नेत्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी शहाजीबापूंनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे (Chandrakant Patil) पाय धरले. काय झाडी, काय डोंगर या डायलॉगमुळे शहाजीबापू मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेत आहेत.

दरम्यान मागच्या तीन दिवसात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर खळबळ माजली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. फडणवीसांनी जसा सरकार स्थापनेचा दावा केला तसे एकनाथ शिंदे राज्यात आले आणि थेट राज्यपालांच्या भेटीला गेले.

हे वाचलं का?

सर्वांना वाटत होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार परंतु स्वत: फडणवीसांनीच पत्रकार परिषद घेत सर्वांना धक्का दिला. फडणवीसांनी स्वत: जाहीर केले की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते की ते सरकारबाहेर राहणार आहेत. परंतु केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश दिले. परिणामी फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

उद्या विधानभवनात एकवाथ शिंदे यांच्या गटाचे भवितव्य ठरणार आहे. कारण एका बाजूला खरी शिवसेना असलेल्या उद्धव ठाकरेंचा गट आहे तर दुसऱ्या बाजूला एकवाथ शिंदे यांचा गट आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत मान्यता मिळालेली नाही. १६ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईची केस सुप्रीम कोर्टात आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटनेते पदाचाही वाद आहे. या सर्वांचा निकाल ११ जुलैला लागणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्वरीत विधानसभेच्या अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे. त्यामुळे आता उद्या कोणाच्या बाजूने निकाल लागतो हे पाहावं लागणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT