लवकरच बिहारलाही जेडीयू मुक्त करु : खासदार मोदींचा सुचक इशारा
पाटना : भाजपची साथ सोडून एका रात्रीत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत सत्ता स्थापन करणाऱ्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपने सलग दुसरा झटका दिला आहे. अरुणाचल प्रदेश पाठोपाठ मणिपूरमध्येही नितीश कुमार यांच्या पक्षातील 5 आमदारांना फोडून भाजपने आपल्या पक्षात घेतले आहेत. त्यामुळे देश पातळीवरील राजकारण करत असलेल्या नितीश कुमार यांच्या जदयूला हा […]
ADVERTISEMENT

पाटना : भाजपची साथ सोडून एका रात्रीत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत सत्ता स्थापन करणाऱ्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपने सलग दुसरा झटका दिला आहे. अरुणाचल प्रदेश पाठोपाठ मणिपूरमध्येही नितीश कुमार यांच्या पक्षातील 5 आमदारांना फोडून भाजपने आपल्या पक्षात घेतले आहेत. त्यामुळे देश पातळीवरील राजकारण करत असलेल्या नितीश कुमार यांच्या जदयूला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, जेडीयुला दिलेल्या या धक्क्यावर राज्यसभा खासदार आणि बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी आता लवकरच बिहारलाही जेडीयू मुक्त करु अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अरुणाचल प्रदेश पाठोपाठ आता मणिपूरही जेडीयूमुक्त झाले आहे. या सर्व आमदारांना एनडीएमध्ये राहायचे होते. आता लवकरच आम्ही बिहारमधीलही जेडीयू-आरजेडी युती संपुष्टात आणून राज्याला जेडीयूमुक्त करु. तसेच नितीश कुमार यांची खिल्ली उडवत ते म्हणाले की, “होर्डिंग्ज आणि पोस्टर्स लावून कोणताही नेता पंतप्रधान बनू शकत नाही.”
JD(U)MLAs : 2024 च्या तयारीला लागलेल्या नितीश कुमारांना भाजपने दिला आणखी एक झटका!
MLAs join BJP : जदयूला मणिपूरमध्ये झटका
मणिपूर विधानसभेचे सचिव मेघजीत सिंह यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, जदयूच्या पाच आमदारांचा भाजपातील प्रवेश स्वीकृत करण्यात आला आहे. घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार स्वीकारलं गेलं आहे.