वादग्रस्त आमदार टी. राजा यांना भाजपनं केलं निलंबित; ‘त्या’ विधानावरून पोलिसांनीही केली अटक
भाजपने तेलंगणाचे आमदार टी राजा यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यांना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावून पक्षातून बाहेर का काढू नये, याचे १० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. टी राजा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांना हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. विविध ठिकाणी तक्रारी दाखल टी. राजा यांनी नुकताच […]
ADVERTISEMENT

भाजपने तेलंगणाचे आमदार टी राजा यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यांना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावून पक्षातून बाहेर का काढू नये, याचे १० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. टी राजा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांना हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली.
विविध ठिकाणी तक्रारी दाखल
टी. राजा यांनी नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाष्य केले आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथित वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. एवढेच नाही तर डबीरपुरा, भवानीनगर, रेनबाजार, मीर चौक पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने लोक तक्रारी दाखल करण्यासाठी आले होते. यामुळे एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे संतप्त लोकांनी सांगितले.
कॉमेडियन मुनवर फारुकीवरही अभद्र टिपण्णी
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांच्या कार्यालयासमोर आणि शहरातील अनेक भागात निदर्शने सुरू झाली. त्याच्या अटकेच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. या व्हिडिओमध्ये टी. राजा यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि त्याच्या आईवरही भाष्य केले आहे.