आमदार शिफारसीच्या ‘बोगस पत्रा’चा बॉम्ब; राज्यात खळबळ, राजभवनाला करावा लागला खुलासा
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र टीव्ही माध्यमांमध्ये येऊन धडकलं. त्याची शहानिशा न करता टीव्ही माध्यमांनी बातमी चालवून टाकली. महाराष्ट्रात या पत्रामुळे एकच खळबळ माजली. ही खळबळ इतकी वाढली की राजभवनाला पुढे येऊन खुलासा करावा लागला आणि सांगावं लागलं की ते पत्र बनावट आहे. वाचा नेमकं काय घडलं? काही वेळापूर्वीच एक […]
ADVERTISEMENT
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र टीव्ही माध्यमांमध्ये येऊन धडकलं. त्याची शहानिशा न करता टीव्ही माध्यमांनी बातमी चालवून टाकली. महाराष्ट्रात या पत्रामुळे एकच खळबळ माजली. ही खळबळ इतकी वाढली की राजभवनाला पुढे येऊन खुलासा करावा लागला आणि सांगावं लागलं की ते पत्र बनावट आहे.
ADVERTISEMENT
वाचा नेमकं काय घडलं?
हे वाचलं का?
काही वेळापूर्वीच एक पत्र टीव्ही माध्यमांमध्ये येऊन धडकलं. हे पत्र राज्यपालांनी उद्धव ठाकरेंनी लिहिल्याचं यात दिसतं आहे. त्यात असा उल्लेख करण्यात आला आहे की महाराष्ट्र विधान मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या रिक्त झालेल्या जागी सहा नावं सुचवल्याचा उल्लेख आहे.
वीरभद्रेश करबसप्पा बसवंती, रमेश कोकाटे, सतीश घरत, संतोष अशोक नाथ, मोरेश्वर भोंडवे, जगन्नाथ पाटील या सहा नावांची शिफारस करण्यात आल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यांनी २० वर्षातील उल्लेखनीय योगदान पाहता त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करीत आहे. आपण राज्य मंत्रिमंडळाच्या सहमतीने नावाचा प्रस्ताव सादर करावा. असं या पत्रात म्हटलं गेलं आहे. मात्र या पत्रात अनेक चुका आहेत ज्या बातमी चालवताना टीव्ही माध्यमांनी लक्षातच घेतलेल्या नाहीत.
ADVERTISEMENT
काय चुका आहेत पत्रात?
ADVERTISEMENT
पत्रावर २९ सप्टेंबर २०२० ही तारीख आहे.
राज भवन, मलबार होल असा उल्लेख करण्यात आला आहे
ठाकरे सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यात विस्तव का जात नाही?
या दोन प्रमुख चुकांकडे दुर्लक्ष करून या पत्रावरून बातमी करण्यात आली आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या नावे असलेलं हे पत्र इतकं व्हायरल झालं की ही बातमी टीव्ही माध्यमांनी केली. त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ माजली. अखेर या प्रकरणी राज भवनाला खुलासा करावा लागला.
अशा प्रकारचं कुठलंही पत्र राज्यपालांनी लिहिलेलं नाही. सदर पत्र बनावट आहे असं राज्यपाल भवनाचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी मुंबई तकला फोनवरून दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न दीड वर्षापासून जास्त काळ पडून आहे. राज्यपाल या पत्रावरच सहीच करत नाहीत हे जाणीवपूर्वक केलं जातं आहे असा आरोप सत्ताधारी पक्षांकडून अनेकदा केला गेला आहे. अशात सहा नावं राज्यपालांनी सुचवल्याचं पत्र समोर आलं आणि एकच खळबळ उडाली होती. मात्र हे पत्र बनावट असल्याची माहिती राजभवनाने दिली आहे. अशात काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्र जर बनावट असेल तर त्यावर राजभवनाचा शिक्का कसा काय? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT