प्रियकराकडून डॉक्टर प्रेयसीची हत्या, लव्ह जिहादचा आरोप… प्रकरण काय?
जम्मू: जम्मूमध्ये हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिला डॉक्टरची तिच्या प्रियकराने भोसकून हत्या केली. यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पोहोचून मारेकऱ्याला रुग्णालयात दाखल केलं. गुन्हा दाखल करण्यासोबतच आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपीची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे त्याचा जबाब अद्याप तरी नोंदवता आलेला नाही. […]
ADVERTISEMENT
जम्मू: जम्मूमध्ये हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिला डॉक्टरची तिच्या प्रियकराने भोसकून हत्या केली. यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पोहोचून मारेकऱ्याला रुग्णालयात दाखल केलं. गुन्हा दाखल करण्यासोबतच आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपीची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे त्याचा जबाब अद्याप तरी नोंदवता आलेला नाही. गुन्हा करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर लिहिले होते की, काही वैयक्तिक कारणांमुळे आपण आपले जीवन संपवणार आहोत. (boyfriend killed doctor girlfriend said this in facebook post)
ADVERTISEMENT
डॉक्टरची हत्या हे लव्ह जिहादचे प्रकरण – बजरंग दल
या प्रकरणी बजरंग दलाने हिंदू डॉक्टरची हत्या हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लव्ह जिहादविरोधात कायदा आणावा, अशी मागणी आता होत आहे. दुसरीकडे, जम्मू पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे.
विशेष म्हणजे, जौहर गनई याने काही वैयक्तिक कारणांमुळे आपले जीवन संपवणार असल्याची पोस्ट फेसबुकवर लिहिली होती, असे आरोपीच्या नातेवाईकाने पोलिसांना सांगितले. यावर पोलीस जम्मूतील जानीपूर येथील जोहरच्या घरी गेले. घराचे गेट बाहेरून बंद होते त्यामुळे पोलिसांना बरीच कसरत करत घरात घुसावं लागलं. पण जेव्हा पोलीस जौहरच्या घरी पोहतले तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. कारण यावेळी घरात महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, तर आरोपी देखील पोटात गंभीर जखमा झाल्याने निपचित पडला होता. यावेळी पोलिसांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
हे वाचलं का?
खुनाचा गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे नाव डॉ. सुमेधा शर्मा रा. तालाब तिल्लो (जम्मू) असे आहे. तर आरोपी जौहर गनई हा दोडा जिल्ह्यातील भदेरवाह येथील आहे. आरोपीचे कुटुंब सध्या पंपोश कॉलनीत राहते. कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून पोलिसांनी महिलेचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. यासोबतच भादंवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Tunisha Sharma प्रकरणात लव्ह जिहाद? आत्महत्येचं खरं कारण काय; पोलिसांनी केला खुलासा
ADVERTISEMENT
सुमेधा ७ मार्च रोजी जानीपूर येथील जौहरच्या घरी गेली होती
सुमेधा शर्मा आणि जौहर यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांनी जम्मूमधील डेंटल कॉलेजमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) केली. आता सुमेधा शर्मा जम्मू-काश्मीरच्या बाहेरील कॉलेजमधून एमडीएस करत होती. होळीच्या सुट्टीत ती जम्मूला आली होती आणि 7 मार्चला जानीपूर येथील जोहरच्या घरी गेली होती.
ADVERTISEMENT
Nalasopara Crime: क्रूर! लिव्ह इन पार्टनरची हत्या, बेडमध्ये लपवला मृतदेह
येथे काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यादरम्यान जौहरने सुमेधाचा चाकूने खून केला. यानंतर त्याने याच चाकूने आत्महत्येचा प्रयत्नही केला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी आरोपी आणि मृत दोघांच्या नातेवाईकांनी मौन बाळगले आहे.
‘मी इस्लाम स्वीकारला, फातिमा बनले’; राखी सावंत लव्ह जिहादबद्दल काय बोलली?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT