जेवणादरम्यान झालेला वाद टोकाला, अमरावतीत मेव्हण्यांकडून भाऊजींची हत्या
अमरावतीमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मेव्हण्यांनी आपल्याच भाऊजींची भाल्यासारख्या धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २० फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजल्याच्या दरम्यान वलगाव भागात हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिन्ही फरार आरोपींचा शोध सुरु आहे. कन्हैया पवार असं मृत व्यक्तीचं नाव असून आरोपींपैकी किसन शिंदे आणि राजेश शिंदे हे […]
ADVERTISEMENT
अमरावतीमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मेव्हण्यांनी आपल्याच भाऊजींची भाल्यासारख्या धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २० फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजल्याच्या दरम्यान वलगाव भागात हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिन्ही फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
ADVERTISEMENT
कन्हैया पवार असं मृत व्यक्तीचं नाव असून आरोपींपैकी किसन शिंदे आणि राजेश शिंदे हे त्याचे मेव्हणे आहेत. याव्यतिरीक्त तिसरा आरोपी किसना भोसले हा नातेवाईक असल्याचं कळतंय.
अमरावतीच्या दसरा मैदान भागातील झोपडपट्टीत शिंदे बंधू व किसना भोसले हे २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कन्हैयाकडे जेवणासाठी आले होते. यावेळी रात्री जेवण करत असताना किसन आणि राजेश यांच्यात वाद झाला. कन्हैयाची पत्नी गंगा हिने आपल्या भावांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कन्हैयालाच मारा, असं किसना भोसले म्हणाला. यानंतर त्याने चाकू-भाल्यासारखं शस्त्र किसनकडे दिले. राजेशने कन्हैयाला पकडून ठेवले तर किसनने कन्हैयावर वार करून त्याची हत्या केली.
हे वाचलं का?
अल्पवयीन मुलीची ६ जणांना विक्री, साताऱ्याच्या पाटण येथील धक्कादायक प्रकार उघडकीस
या घटनेनंतर तिनही आरोपी फरार झाले असून कन्हैयाची पत्नी गंगाने पोलीसांत तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.
ADVERTISEMENT
दुर्दैवी ! अवघ्या तीन दिवसांत मोडला संसार; रस्ते अपघातात नवऱ्या मुलीसह ५ जणांचा मृत्यू
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT