‘पहिले तू सुधार, लोकांचं काय पाहतो’; गुलाबराव पाटलांचा चंद्रकांत खैरेंवर पलटवार
मनीष जोग : जळगाव एकनाथ शिंदे गटातील पन्नासच्या पन्नास आमदार येणाऱ्या निवडणुकीत नाही पडले तर मी हिमालयात जाईन, असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. यावर आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, तुम्ही स्वतः निवडून आले नाही. एमआयएमने तुम्हाला पाडून […]
ADVERTISEMENT

मनीष जोग : जळगाव
एकनाथ शिंदे गटातील पन्नासच्या पन्नास आमदार येणाऱ्या निवडणुकीत नाही पडले तर मी हिमालयात जाईन, असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. यावर आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, तुम्ही स्वतः निवडून आले नाही. एमआयएमने तुम्हाला पाडून टाकलं. पहिलं तू सुधर, लोकांचं काय पाहतो, अशा एकेरी शब्दात उल्लेख करत चंद्रकांत खैरेंवर जोरदार पलटवार केला.
भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात दिवसंदिवस एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. दररोज आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या जात आहे. एकमेकांच्या हाडवैऱ्याप्रमाणे शाब्दिक हल्ले सुरु आहेत.
दोन्ही गटात व्हिडीओ वॉर सुरु