ट्रॅफिक हवालदार कारच्या बोनेटवर बसले असतानाही पळवली गाडी, मुंबईच्या अंधेरी भागातली धक्कादायक घटना
मुंबईच्या अंधेरी भागातील आझार नगर परिसरात आज एक धक्कादायक घटना पहायला मिळाली. सकाळी ११ वाजल्याच्या दरम्यान एका कारचालकाने ट्रॅफिक पोलीस हवालदाराला कारच्या बोनेटवर बसलेलं असतानाच गाडी चालवली. हा प्रकार व्हिडीओत कैद झाला असून पोलिसांनी सदर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं आहे. ट्रॅफिक पोलीस हवालदाराचं नाव विजयसिंह गुरव असं असून सकाळच्या दरम्यान गुरव आपल्या […]
ADVERTISEMENT
मुंबईच्या अंधेरी भागातील आझार नगर परिसरात आज एक धक्कादायक घटना पहायला मिळाली. सकाळी ११ वाजल्याच्या दरम्यान एका कारचालकाने ट्रॅफिक पोलीस हवालदाराला कारच्या बोनेटवर बसलेलं असतानाच गाडी चालवली. हा प्रकार व्हिडीओत कैद झाला असून पोलिसांनी सदर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं आहे.
ट्रॅफिक पोलीस हवालदाराचं नाव विजयसिंह गुरव असं असून सकाळच्या दरम्यान गुरव आपल्या पथकासह आझाद नगर भागात ड्युटीवर होते. यावेळी आरोपी कारचालक आपल्या हुंडाई क्रेटा गाडीतून त्या ठिकाणी आला. गुरव यांनी या चालकाला कार थांबवण्याची विनंती केली. परंतू गाडी थांबवायच्या ऐवजी हा कारचालक आणखी वेगाने पळवायला लागला. यानंतर गुरव आणि त्यांच्या पथकाने या गाडीला थांबवलं आणि कारवाईसाठी गुरव त्या गाडीच्या बोनेटवर बसले.
यावेळी या भागात गर्दी जमा झाली. पोलीस या चालकाला कारबाहेर येण्यासाठी विनंती करत होते. परंतू कारचालक गाडीच्या बाहेर यायला तयार नव्हता. अखेरीस या कारचालकाने पोलीस हवालदार गुरव बोनेटवर बसलेले असतानाच गाडी पळवली. काही अंतरावर गेले असता गुरव खाली पडल्यानंतर हा कारचालक तिकडून पसार झाला. या प्रकारानंतर वाहतूक पोलिसांनी डी.एन.नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कारचालकाविरुद्ध पोलिसांनी IPC च्या ३५३, २७९, ३३६ आणि १८४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा कारचालक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT