टाळूवरचं लोणी खाणारे महाभाग! पुण्यात उघडकीस आला स्मशान घोटाळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे एक उदाहरण समोर आलं आहे. आतापर्यत आपण पाहिले असेल की आधी घोटाळे झाल्यानंतर आरोप केले जात असत. मात्र आता पुण्यात एक वेगळाच घोटाळा समोर उघड़कीस आला आहे. काम झालं नाही तरीही एक कोटी रूपयांचं पेमेंट केलं जाणार होतं.

ADVERTISEMENT

पुणे शहरातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी, हडपसर येथील अमरधाम, कोथरूड आणि बाणेर येथील स्मशानभूमीमधील विद्युत विषयक कामांचे एकूण एक कोटींच्या रक्कमेचे बिल अदा करण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन बिल अदा करण्यात यावे असा शेरा विभागाकडून देण्यात आलेला होता. मात्र ज्या विद्युत विभागाचे हे काम होतं त्यांना याची कुठलीच कल्पना नव्हती जेव्हा या कामांची विचारणा त्यांच्याकडे झाली तेव्हा असं कुठलंही कंत्राट दिलेलेच नसल्याचा खुलासा झाला. आता या प्रकरणी पुणे महापालिकेने ठेकेदाराविरोधात  शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.

हे वाचलं का?

कोव्हिडच्या काळात कुठलीही निविदा नसताना आशय इंजिनिअरींग आणि असोसिएटस यांनी पालिकेकडे चार स्मशानभूमीच्या विद्युत कामांसाठीचे एक कोटी रुपयांचे बिल सादर केलं. विद्युत विभागात या बिलाची फाईल इनवर्ड झाल्यानंतर ते कनिष्ठ अभियंता,उप अभियंता , कार्यकारी अभियंता , अधीक्ष अभियंता ह्यांच्या सह्या असलेले 25 लाखांची चार बिलं , म्हणजेच एक करोड़ रूपयाचे बिल्स विद्युत विभागाकडून जावक करुन , आरोग्य विभागात कोव्हिड 19 च्या तरतूद घेण्याचा प्रयत्न करत असतांना , सदर बिलाचे मुख्य अभियंताच्या लक्षात आल्याने , पेमेंट ताबड़तोप थांबविन्यात आले. जानेवारी महिन्यांत ही कामे केल्याचे दाखवून त्यासंबधीची सर्व मंजुरीची हुबेहुब कागदपत्रे या फाईलमध्ये जोडण्यात आली होती.

कडबा कटिंग मशीनमध्ये केस अडकून नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

ADVERTISEMENT

महापालिकेचे मुख्य अभियंता विद्युत विभाग , श्रीनिवास कंदुल ह्यांच्याशी मुंबईतक ने विचारणा केली तेव्हा कंदुल म्हणाले की त्यांच्या कड़े हे एक करोड़ रूपयांचे बिल दिवाळीच्या आधी हे बिल त्यांच्याकड़े दिलं. सदर बिलासाठी विद्युत विभागाचे अधिक्षक अभियांता सौ शेकटकर ह्यांनी फोन केला की त्यांच्या कड़े एक कोटी रूपये पेमेंट करण्यासाठी बिल आले आहे. पण चार स्मशानभूमींपैकी वैकुंठ स्मशानतभूमीत कोणतेही विद्युतीकरण किंवा नुतनिकरणाचे काम होऊ शकत नाहीय कारण प्रदूषणावरुन कोर्ट केस सुरु आहे. याचा अंदाज येताच

ADVERTISEMENT

श्रीनिवास कंदुल ह्यांनी आयुक्त विक्रम कुमार ह्यांच्या कडून फौजदारी दाखल करण्यासाठी परवानगी घेतली आणि तसे पाउल उचलले.

आशय इंजिनीरिंगचे योगी चंद्रशेखर मोरे हे मालक आहेत , त्यांच्यावर हा घोटाळा करण्याचा आरोप लागला आहे आणि fir सुद्धा झाली आहे. मात्र आरोपी मोरे ह्यांचा कोणालाच पत्ता नाही .या फाईलची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यावर आरोग्य विभागाकडून माहिती मागविण्यात आली. त्यात अशा पध्दतीच्या कामांसाठी कोणत्याही प्रकारच्या निविदाही काढण्यात आल्या नव्हत्या आणि त्यासंबधीचे आदेशही दिले गेले नव्हते असे सांगण्यात आले. त्यामुळे ही एक कोटींचे बोगस बिले असल्याचे स्पष्ट असल्याचं महापालिका मुख्य अभियंता विद्युत विभाग श्रीनिवास कंदील यांनी सांगितलं आहे.

अनावधाने हा प्रकार समोर आला.मात्र अशा प्रकारची किती बोगस बिले निघाली असतील असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, श्रीनिवास कंदील ह्यांच्या कडून सर्व अधिकारी म्हणजेच कनिष्ठ अभियंता पासून वरिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे आणि संबंधित ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय. मात्र सामान्य पुणेकरांच्या कराचा पैसा महापालिका आशा प्रकारे उडवत असेल तर महापालिका विकास कोणाचा होतोय असा प्रश्न पुणेकरांना पडलाय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT