Pathan Movie : वादात सापडलेल्या पठाण चित्रपटात काही बदल करण्याचा सेंसर बोर्डचा सल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pathan Movie मुंबई : ‘पठाण’ चित्रपटाच्या विरोधात हिंदू समितींद्वारे तीव्र आक्षेप आणि विरोध केला जात आहे. हिंदू(Hindu) आणि मुस्लिम संघटनांनी याआधीच चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा दिला होता. हिंदू सेनेने सेन्सॉर बोर्डाचे (censor board) अध्यक्ष प्रसून जोशी यांना पत्र लिहून चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु, आता सेंसर बोर्डाने या चित्रपटात काही बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

शाहरूख खानच्या(shahrukh Khan) ५७व्या वाढदिवसानिमित्त पठाण या चित्रपटाचा टिझर लॉंच करण्यात आला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेण्याचे मुख्य कारण म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोणने(Deepika Padukon) परिधान केलेली भगव्या रंगाची बिकिनी आहे. यावरून भारतात बरेच राजकारण झाले. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण वादात एक नवीन माहिती समोर आली आहे. चित्रपट निर्मात्यांना या अपडेटमुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांना चित्रपटात बरेच बदल करावे लागतील.

या चित्रपटातील बेशरम रंग(Besharam Rang) या गाण्यावरूनही बराच गदारोळ झाला होता. सीबीएफसी एक्झॅमिनेशन कमिटी चित्रपटाच्या सर्टिफिकेशनसाठी गेली होती. त्यानंतर सीबीएफसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चित्रपटाचे सर्व पैलू पाहिले गेले. यानंतर, निर्मात्यांना चित्रपटात काही बदल करण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे.

हे वाचलं का?

सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात भगवी बिकनी आणि गाण्यामध्ये काही बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी म्हणतात, “सेन्सॉर बोर्ड नेहमीच सर्जनशील अभिव्यक्ती आणि लोकांच्या संवेदनशीलतेमध्ये योग्य संतुलन राखते. आमचा विश्वास आहे की परस्पर संवादातून सर्व समस्यांवर तोडगा निघू शकतो. सुचवलेले बदल पूर्ण होईपर्यंत, मी सांगू इच्छितो की आपली संस्कृती आणि श्रद्धा वैभवशाली, जटिल आणि सूक्ष्म आहे. कोणत्याही कथेतून त्याची व्याख्या होऊ नये याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. निर्मात्यांनी या दिशेने काम केले पाहिजे.”

पठाण चित्रपटावरील वादावर ‘बिग बी’ काय म्हणाले?

अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘रुपेरी पडदा राजकीय विचारसरणीची रणभूमी बनत आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.’

ADVERTISEMENT

दीपीकाच्या ‘बेशरम रंग’ गाण्याला अभिनेता प्रकाश राज यांचे समर्थन!

प्रकाश राज यांनी पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याचे समर्थन केले. ते म्हणाले की, ‘#बेशरम बिगोट्स.. जेव्हा भगवा परिधान केलेल्या बलात्काऱ्यांना हार घालण्यात येतो तेव्हा ठीक आहे, द्वेषपूर्ण भाषणे दिली जातात, दलाल आमदार, भगवे कपडे परिधान करून स्वामीजी अल्पवयीन मुलांवर बलात्कार करतात पण चित्रपटात त्या रंगाचा ड्रेस नाही चालत?

ADVERTISEMENT

Pathan Movie: बिकीनीचा वाद अन् पुष्कर श्रोत्रीने राम कदमांना सरळ दिलं ‘हे’ चॅलेंज

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT