उद्धव ठाकरेंसोबत ‘फक्त वंचित शक्ती’ : नव्या आघाडीची आठवलेंकडून खिल्ली
Ramdas Athawale criticized Shivsena – Vanchit Bahujan Aaghadi Alliance पुणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी किती ही प्रयत्न केला तरी आंबेडकरी मतदार आमच्याचसोबत राहणार आहे. शिवशक्ति भीमशक्ति म्हणता येणार नाही. ही तर शिव शक्ति आणि वंचित शक्ति म्हणता येईल अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत […]
ADVERTISEMENT

Ramdas Athawale criticized Shivsena – Vanchit Bahujan Aaghadi Alliance
पुणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी किती ही प्रयत्न केला तरी आंबेडकरी मतदार आमच्याचसोबत राहणार आहे. शिवशक्ति भीमशक्ति म्हणता येणार नाही. ही तर शिव शक्ति आणि वंचित शक्ति म्हणता येईल अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या युतीची खिल्ली उडवली. (Ramdas Athawale criticized Shivsena – Vanchit Bahujan Aaghadi Alliance)
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सोबत १८ ते २० टक्के शिवसेना राहिली असून त्यांची ताकद क्षीण झाली आहे. त्यामुळे आता त्यांची धडपड सुरू झाली आहे. हे लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला असला तरी शिवशक्ति-भीम शक्ति म्हणता येणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना शिवशक्ति आणि भीम शक्तिचा प्रयोग झाला होता. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत यश मिळाल आहे. पण खरी भीम शक्ति आपल्या सोबत आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आल्याने भाजप, शिंदे गट आणि आरपीआय या आमच्या महायुतीवर काहीच परिणाम होणार नाही. तसंच आम्हाला आगामी निवडणुकीत प्रचंड यश मिळणार असल्याचं त्यांनी सांगितले.
Jayant Patil: ‘वंचित’बद्दल NCP सकारात्मक! मातोश्रीवर काय झाली चर्चा?