Omicron : हाच ट्रेंड दुसरी लाट येण्यापूर्वी दिसला; ‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर केंद्राचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण हळूहळू वाढताना दिसत आहे. ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल अशी भीतीही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांकडून कोरोना वाढीस अनुकूल अस वर्तन केलं जात असल्याचं दिसत आहे. त्यावर केंद्राने चिंता व्यक्त केली असून, कोविडच्या दुसऱ्या लाटेपूर्वीही अशीच स्थिती दिसून आली होती, असं केंद्राने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत नागरिकांकडून कोरोना नियमावलीबद्दल होत असलेल्या बेजबाबदार वर्तनावर चिंता व्यक्त केली. पार्ट्या, लग्न आणि इतर गर्दीचे कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित केले जात आहे. त्यामुळे आम्ही विनंती आहे की, अशा ठिकाणी शंभर टक्के कोविड नियमांचं पालन करावं’, असं अग्रवाल म्हणाले.

देशभरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. यावेळी आरोग्य मंत्रालयाने एक आलेख सादर केला. देशातील नागरिक मास्क वापरण्याबद्दल उदासिन दिसत असून, दुर्लक्ष दिसत आहे, असं आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. वी.के. पॉल म्हणाले की, कोविडची दुसरी लाट येण्यापूर्वी नागरिकांचं मास्क वापरण्याचं प्रमाण जितकं कमी झालं होतं, त्या पातळीवर आपण पोहोचलो आहोत. दुसऱ्या लाटेपूर्वी असाच ट्रेंड दिसला होता, असं सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली.

हे वाचलं का?

देशातील रुग्णांची संख्या 33 वर

देशातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली आहे. शनिवारी सकाळी दिल्लीत दुसरा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आला. त्यामुळे एकूण संख्या वाढली आहे. झिब्बाबेतून हा प्रवासी आला असून, जिनोम सिक्वेन्सिगच्या रिपोर्टमधून त्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं निदान झाला.

ADVERTISEMENT

देशातील एकूण 33 रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 17, राजस्थानात 9, गुजरातमध्ये 3, दिल्लीत 2 आणि कर्नाटकात 2 असे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी राजस्थानातील 9 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर मुंबई, पुणे आणि डोंबिवलीतील प्रत्येकी एका रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT