पुणे – इंदापूरमध्ये टोकाचे विरोधक झाले गणपती बाप्पाच्या पालखीचे भोई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : राज्यभरात गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि वाजतगाजत पार पडले. या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात देशभरात गणपती मंडळ, देखावे, मिरवणूक यानिमित्ताने सर्वजण एकत्र आल्याचे दृश्य पाहायला मिळाले होते. याला आजचा शेवटचा दिवसही अपवाद नव्हता.

ADVERTISEMENT

आज पुणे आणि इंदापुरमध्येही राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडविणारे चित्र पाहायला मिळाले. आज पुण्यात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील तर इंदापुरमध्ये हर्षवर्धन पाटील-प्रदिप गारटकर या टोकाच्या विरोधकांनी एकत्र गणपतीची पालखी उचलली.

पुण्यात नेमके काय झाले?

मुंबईनंतर आदित्य ठाकरे यांनी पुणे येथील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु होताना आदित्य ठाकरे पोहचले. त्याचवेळी पुण्याचे आमदार चंद्रकांत पाटील हेही तिथे उपस्थित होते. दोन विरोधक समोरासमोर आल्याने कार्यकर्त्यांची काहीशी काळजी वाढली होती. मात्र दोघांनी राजकीय परिपक्वता बाजूला ठेवून मानाच्या कसबा गणपतीची एकत्र पालखी उचलली.

हे वाचलं का?

हर्षवर्धन पाटील-प्रदीप गारटकर यांनी दिला मानाच्या पहिल्या गणपतीच्या पालखीला खांदा

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची महाआरती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली.

ADVERTISEMENT

महाआरती झाल्यानंतर मंडळाच्या गणेशाची पालखी त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला. पारंपारिक वाद्याच्या गजरात फुलांच्या पायघड्या घालत काढण्यात आलेली श्रीगणेशाची मिरवणूक इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतून खडकपूरा मार्गे विसर्जन ठिकाणी दाखल झाली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT