शिवसेनेला ‘ना घर का ना घाट का’ करून ठेवलं; चंद्रकांत पाटलांचा ‘सामना’तून राऊतांवर प्रहार

मुंबई तक

हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर शिवसेनेनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’तूनच प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तुमच्या उद्योगामुळे शिवसेना किती अडचणीत आली याची तुम्हाला पर्वा नाही’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे. २१ सप्टेंबर रोजी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर शिवसेनेनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’तूनच प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तुमच्या उद्योगामुळे शिवसेना किती अडचणीत आली याची तुम्हाला पर्वा नाही’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे.

२१ सप्टेंबर रोजी सामनात ‘तोंडास फेस; कोणाच्या?’ या शीर्षकाखालील अग्रलेखातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीका करण्यात आली होती. त्याला चंद्रकांत पाटील यांनी लेख लिहून उत्तर दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा लेख सामनामध्येच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

तुम्ही मला सातत्याने भरपूर प्रसिद्धी मिळवून देता. राजकारणात प्रसिद्धी महत्त्वाची असते. ‘एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी’, असे राजकारणासाठी म्हणतात. तुम्ही माझ्यावर नियमित टीका करता आणि त्याची चर्चा मीडिया करते, मग मला आपसूक प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धीच्या बाबतीत आम्ही संघवाले तसे कच्चे आहोत. आम्हाला संघात शिकवले जाते की, ‘अच्छा कर और कुएं मे डाल.’ म्हणजे चांगले काम करा आणि विसरून जा. संघात प्रसिद्धी आणि स्वतःचे ब्रँडिंग असे विषय वर्ज्य असतात. त्यामुळे संघ ही जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना असूनही कोठेही प्रसिद्धीचा बडेजाव नसतो. माझ्यासारख्या संघ स्वयंसेवकाला हे प्रसिद्धीचे प्रकरण मोठे अवघड जाते. पण संजय राऊत, तुम्ही माझ्यावर टीका करता आणि आपसूक प्रसिद्धी मिळते. आता मी संघाचे नाही तर एका राजकीय पक्षाचे काम करतो. राजकारणात संघासारखे प्रसिद्धीपराङ्मुख असून चालत नाही. म्हणजे प्रसिद्धीकडे पाठ फिरवून चालत नाही. हो, जरा वेगळा शब्द वापरला की तुम्हाला अर्थ सांगावा लागतो. राजकारणात प्रसिद्धी तर हवीच. ती तुम्ही मला मिळवून देता म्हणून तुमचे आभार.

हे वाचलं का?

    follow whatsapp