पुन्हा लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
मुंबई: ‘आपल्याला पुन्हा लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे.’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबत लोकांमध्ये असणाऱ्या बेफिकीरीबाबत प्रचंड चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला पुन्हा एकदा कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘आपल्याला पुन्हा लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे.’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबत लोकांमध्ये असणाऱ्या बेफिकीरीबाबत प्रचंड चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला पुन्हा एकदा कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली तेव्हा त्यांनी अशाप्रकारचे आदेश दिले आहेत.
‘लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे. त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे.’ असे थेट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
याकडेही लक्ष द्या: कोरोना गेलाय अशा थाटात वागू नका, नाहीतर…
पाहा आजच्या बैठकीत मुख्यमंत्री काय म्हणाले त्यातील 5 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण वाचलेच पाहिजेत: