CM शिंदे मनोहर जोशी-मिलिंद नार्वेंकरांच्या घरी : ठाकरेंच्या सहकाऱ्यांशी जवळीक वाढवली?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यांनी दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी साधताना राज ठाकरेंची शस्त्रक्रिया झाली त्यानिमित्त भेट घेतली. तसंच गणरायाचे दर्शन घेतले, असे सांगितले. सगळीकडे गणपतीचं आगमन झालं आहे. सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपण पाहतो आहे. गणेश उत्सवानिमित्त आम्ही सगळेच जण एकमेकांकडे […]
ADVERTISEMENT
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यांनी दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी साधताना राज ठाकरेंची शस्त्रक्रिया झाली त्यानिमित्त भेट घेतली. तसंच गणरायाचे दर्शन घेतले, असे सांगितले. सगळीकडे गणपतीचं आगमन झालं आहे. सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपण पाहतो आहे. गणेश उत्सवानिमित्त आम्ही सगळेच जण एकमेकांकडे जात असतो, असे ते म्हणाले.
ADVERTISEMENT
मिलिंद नार्वेकर – मनोहर जोशी यांच्या घरी
मात्र त्यानंतर ते अचानक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासार्ह समजल्या जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांच्या घरी पोहचले. त्यानंतर शिंदे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्याही घरी गेले. एका बाजूला ठाकरे-शिंदे यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष सुरु असतानाच मनोहर जोशी आणि मिलिंद नार्वेकरांशी एकनाथ शिंदे यांची सत्तास्थापनेनंतरची दुसरी भेट होती. त्यामुळे ठाकरे यांच्या सहकाऱ्यांशी शिंदे यांनी जवळीक वाढवली आहे का असा सवाल विचारला जात आहे.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले…
हे वाचलं का?
यापूर्वी मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनीही मिलिंद नार्वेकर यांच्या घरी भेट दिली होती. नार्वेकर यांच्या घरी गणरायाची आगमन झाले आहे. त्यामुळे, गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नार्वेकर यांच्या घरी गणेश दर्शन घेण्यासाठी आलो असल्याचे, शेलार यांनी सांगितले होते.
मिलींद नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे खास निकटवर्तीय मानले जातात. याशिवाय नार्वेकर यांच्यावर ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेच्या सचिव पदाचीही जबाबदारी आहे. ज्यावेळी शिंदे गट बंड करुन सुरतला गेला होता, त्यावेळी शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना परत बोलावण्याची जबाबदारी नार्वेकर यांच्यावरच सोपवण्यात आली होती. त्यावेळी नार्वेकर हे देखील सुरतला सुद्धा गेले होते.
ADVERTISEMENT
“शिवसेना-संभाजी ब्रिगेडची सत्ता आणणार” : ठाकरेंच्या मागे मराठा सेवा संघाचेही पाठबळ
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक झाला होता. त्यांच्या मातोश्रींच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी नार्वेकर यांचे सांत्वन केले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT