मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, डमी शिंदे साहेबांना ‘स्वाभिमानी’चं निवेदन, प्रवक्ते म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राजकीय दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यांना मंत्रीमंडळ बैठका घेण्यास पंधरा-पंधरा दिवस वेळ मिळत नाही. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास अडचणी येत आहेत. आता याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी चक्क एकनाथ शिंदे यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे डमी मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झालेले पंढरपूर येथील पांडुरंग शिंदे यांना प्रतिकात्मक निवेदन दिले आहे.

ADVERTISEMENT

रणजित बागल काय म्हणाले?

यावेळी बोलताना बागल म्हणाले, ”राज्याचे मुख्यमंत्री महोदय सध्या राजकीय दौर्‍यामध्ये प्रचंड व्यस्थ आहेत, त्यामुळे त्यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नांविषयी लक्ष देण्यास कदाचित वेळ मिळत नसावा. मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्महत्या करून ही राज्याचे मुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत. ते मागच्या पंधरा दिवसांत फक्त गणपती आरत्या आणि आपल्या गटाचे आमदार महोदय यांचेसोबत भोजन कार्यक्रमात व्यस्त आहेत. आज अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडायच्या कुठे..? म्हणुन आज डमी मुख्यमंत्र्यांकडे प्रतिकात्मक पध्दतीने लोकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.

डमी मुख्यमंत्र्यांना पत्र देत केली मागणी

पुढे बोलताना बागल म्हणाले, राज्यात सध्या जनावरांवर आलेल्या लंपी स्कीन रोगाने हाहाकार माजवला आहे. शिवाय राज्यभरात अनेक भागात तीव्र अतिवृष्टी व काही भागात अवर्षण झाले आहे. मात्र पिकविमा कंपनीने पर्जन्यमानात घोळ करून शेतकर्‍यांना पिकविम्यापासुन वंचित ठेवण्याचा डाव आखला आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदय मात्र कठोर नाहीत. ते गंभीर नाहीत म्हणून निदान डमी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्यावर तरी ओरिजिनल मुख्यमंत्री दखल घेतील ही अपेक्षा यानिमित्ताने बागल यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान नुकताच गणेशोत्सव पार पडला. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच अॅक्टीव्ह झालेले पाहायला मिळाले. राजकीय नेते ते सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. त्यावर विरोधकांनी टीका केली. खासदार सुप्रिया सुळेंनी मी जेव्हाही टीव्ही बघते तेव्हा मुख्यमंत्री टीव्हीवरतीच दिसतात अशी टीका केली होती. आता स्वाभिमानीनं देखील मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT