शिंदे-फडणवीसांचा औरंगाबाद दौरा विमानामुळे अचानक रद्द
CM Shinde DCM Fadnavis Aurangabad visit cancelled: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना आपला पूर्वनियोजित औरंगाबाद दौरा हा अचानक रद्द करावा लागला आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांचा हा दौरा विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे. या सगळ्या तांत्रिक बिघाडामुळे शिंदे आणि फडणवीसांना अर्धा तासाहून […]
ADVERTISEMENT

CM Shinde DCM Fadnavis Aurangabad visit cancelled: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना आपला पूर्वनियोजित औरंगाबाद दौरा हा अचानक रद्द करावा लागला आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांचा हा दौरा विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे. या सगळ्या तांत्रिक बिघाडामुळे शिंदे आणि फडणवीसांना अर्धा तासाहून अधिक वेळ विमानतळावरच ताटकळत राहावं लागलं. (cm shinde dcm fadnavis aurangabad visit cancelled as state aircraft has developed some technical snag)
एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे आज (5 डिसेंबर) औरंगाबाद आणि पुण्याच्या दौऱ्यावर जाणार होते. पण त्याचवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने शिंदे आणि फडणवीस या दोघांनाही एअरपोर्टच्या व्हीआयपी वेटींग रुममध्ये थांबावं लागलं. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोघांनाही जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ ताटकळावं लागलं.
तरीही विमान दुरुस्त होऊ न शकल्याने आणि दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्याचे समजल्यावकर मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री हे आपल्या मतदारसंघात म्हणजेच ठाण्याच्या दिशेने निघाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारने पुण्याला गेले.
दरम्यान, बिघाड झालेलं हे विमान मागील अनेक वर्षांपासून सेवेत आहेत. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात राज्य सरकारने खरेदी केलं होतं. तेव्हापासून हेच विमान मुख्यमंत्री आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दौऱ्यांसाठी वापरलं जातं.
कसं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान?
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबादचा नेमका दौरा कसा होता?
-
सकाळी 10 वाजता: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे VT-VDD या विमानाने औरंगाबादकडे प्रयाण
सकाळी 10.45 वाजता: औरंगाबाद विमानतळावर आगमन
सकाळी 10.50 वाजता: कारने डीएमआयसी-ऑरीक, शेंद्रा, MIDC कडे प्रयाण
सकाळी 11 वाजता: डीएमआयसी-ऑरीक, शेंद्रा, MIDC येथे आगमन
सकाळी 11 वाजता: अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो – 2023 प्रदर्शन
दुपारी 12 वाजता: मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर यांच्याकडील विषयासंदर्भात बैठक
दुपारी 1 वाजता: मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण
दुपारी 1.15 वाजता: VT-VDD या विमानाने पुणेकडे प्रयाण