Maharashtra Rain : दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.

ADVERTISEMENT

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल असंही शासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

अतिवृष्टी आणि कोकणातल्या हाहाकाराबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

हे वाचलं का?

‘अतिवृष्टीच्या पलिकडे जाऊन पाऊस पडतो आहे. अनपेक्षित म्हणावं असंच हे संकट आहे. सर्वतोपरी मदत सुरू आहे. जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत. दुर्दैवाने दरड दुर्घटनेत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोन आला होता. त्यांनीही हरप्रकारे मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. मंगळवार आणि बुधवार झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीने कोकणातील महाडमध्ये हाहाकार उडवला. अतिवृष्टीसोबत दरड कोसळून 38 मृत्यू झाले. ही बाब दुर्दैवी आहे. या ठिकाणी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना मी दिल्या आहेत’

ADVERTISEMENT

राज्यातील कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. ज्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्याचठिकाणी पूर आला आहे. त्यामुळे सर्वप्रथम जीवितहानी होऊ न देण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. पूर ओसरलेल्या भागात रोगराई पसरणार नाही, यासाठी त्याठिकाणी औषधे पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

महाड आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याने बिरवाडी आणि दुर्घटनाग्रस्त भागाशी संपूर्णपणे संपर्क तुटला आहे. ही दुर्घटना होऊन आता अनेक तास उलटले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे अद्यापही दुर्घटनास्थळी बचाव कार्य करणाऱ्या टीम पोहचू शकलेल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार NDRF च्या काही तुकड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT