महावितरण vs महसूल : एकाने वीज तोडली, दुसऱ्याने ऑफिसला ठोकलं टाळं, दोन विभागांमध्ये शीतयुद्ध
– रोहिदास हतागळे, बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यात सध्या दोन सरकारी विभागांमध्ये रंगलेल्या राजकारण आणि शीतयुद्धाची चर्चा रंगली आहे. सर्वात आधी अंबाजोगाई येथे तहसील आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे वीजबिलाचे पाच लाख रुपये थकल्यामुळे महावितरणने या दोन्ही विभागांचा वीजपुरवठा खंडीत केला. ही कारवाई जिव्हारी लागल्यामुळे महसूल विभागानेही ६८ लाख ८४ हजारांचा अकृषीक कर थकवल्याचं कारण देत महावितरणच्या कार्यकारी […]
ADVERTISEMENT
– रोहिदास हतागळे, बीड प्रतिनिधी
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यात सध्या दोन सरकारी विभागांमध्ये रंगलेल्या राजकारण आणि शीतयुद्धाची चर्चा रंगली आहे. सर्वात आधी अंबाजोगाई येथे तहसील आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे वीजबिलाचे पाच लाख रुपये थकल्यामुळे महावितरणने या दोन्ही विभागांचा वीजपुरवठा खंडीत केला. ही कारवाई जिव्हारी लागल्यामुळे महसूल विभागानेही ६८ लाख ८४ हजारांचा अकृषीक कर थकवल्याचं कारण देत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला टाळं ठोकलं आहे.
आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे महसुल विभागाने वसुलीवर भर दिला आहे. तसेच अंबाजोगाईत वीज वितरण कंपनी असलेली महावितरणचे कर्मचारीही वसुलीच्या कामात आहेत. महसुल विभागाचे कर्मचारी सध्या अकृषीक कराच्या वसुलीवर भर देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई शहरातील महावितरणचे वीजबिलाचे ३ लाख ९४ हजार तहसील कार्यालयाकडे तर उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे ८५ हजार रुपये थकले आहेत.
हे वाचलं का?
यापैकी १ लाख ३७ हजारांचा धनादेश दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. तरीही थकबाकीची रक्कम मोठी असल्याचं कारण देत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी वसुली पथकाला तहसील आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयासह तहसीलदारांच्या निवासस्थानाचा विद्युत पुरवठा तोडण्याचे आदेश दिले. ज्यामुळे शुक्रावीर विजेच्या अभावी या दोन्ही कार्यालयाचं काम ठप्प झालं होतं.
दुसरीकडे महावितरणने केलेल्या कारवाईमुळे महसूल विभागानेही कारवाईचा बडगा उगारला आहे. महावितरण कार्यालयाकडे अकृषी करापोटी थकलेल्या ६८ लाख ८४ हजार रुपयांच्या थकबाकीचा दाखला देत तहसीलदार बिपीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या पथकाने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला सील ठोकले. त्यामुळे महावितरणच्या कार्यालयातही महसूल कार्यालयाप्रमाणेच गोंधळ उडाला.
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यात प्रशासनाच्या दोन विभागांमध्ये रंगलेल्या मानापमान नाट्याची चर्चा चांगलीच रंगली. दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ज्यात प्राथमिक टप्प्यात तहसीलदारांचं निवासस्थान वगळता दोन्ही कार्यालयांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT