भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भू विकास बँकेच्या मालमत्तांचं शासनाकडे हस्तांतर करणार असल्याचं ठरवण्यात आलं आहे. आज कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र शेतकऱ्यांसाठीचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर चांगला […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भू विकास बँकेच्या मालमत्तांचं शासनाकडे हस्तांतर करणार असल्याचं ठरवण्यात आलं आहे. आज कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र शेतकऱ्यांसाठीचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवाळीच्या तोंडावर चांगला निर्णय
दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी आपण चांगला निर्णय घेतला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच कालपर्यंत जी अतिवृष्टी झाली त्यात जे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे करून आमच्याकडे पाठवा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना आत्तापर्यंत आपण सात हजार कोटींची मदत केली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी हे सरकार उभं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
मंत्रिमंडळ बैठकीत काय काय निर्णय घेण्यात आले?
नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इस्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र स्थापन करणार. शासनाला दर्जेदार सल्ला आणि धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस घेणार.