Sunil Kedar: काँग्रेसच्या सुनील केदारांना 1 वर्षांची शिक्षा, प्रकरण काय?
Former Congress minister Sunil Kedar has been sentenced to 1 year: नागपूर: काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभेचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. सुनील केदार यांना एका गुन्ह्यात कोर्टाने तब्बल 1 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने याबाबतचा निकाल दिला आहे. (congress former […]
ADVERTISEMENT
Former Congress minister Sunil Kedar has been sentenced to 1 year: नागपूर: काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभेचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. सुनील केदार यांना एका गुन्ह्यात कोर्टाने तब्बल 1 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने याबाबतचा निकाल दिला आहे. (congress former minister sunil kedar sentenced to 1 year what is actual case)
ADVERTISEMENT
नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर येथे अति उच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह मारहाण केल्या प्रकरणात संदर्भात आमदार सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी गेले अनेक दिवस सुनावणी सुरू होती. ज्यानंतर आज (13 जानेवारी) कोर्टाने या प्रकरणी निर्णय देताना सुनील केदार यांना शिक्षा सुनावली आहे.
‘मंत्री केदार चारित्र्यहीन, ताबडतोब बडतर्फ करा’ Congress च्या मंत्र्यावर त्यांच्याच नेत्याचे गंभीर आरोप
हे वाचलं का?
नेमकं प्रकरण काय?
सावनेरचे आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा न्यायालयानं एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 6 ऑक्टोबर 2016 रोजी महापारेषणतर्फे कोराडी-तिडंगीदरम्यान अति उच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही अधिग्रहित करण्यात आल्या होत्या.
वाहिनीसाठी येथे मोठमोठे मनोरे उभारण्यात आलेले. ६ ऑक्टोबर 2016 रोजी महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर हे दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी त्यांच्या पिकहानीच्या भरपाईसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी गेले होते. अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आमदार सुनील केदार त्यांच्या सुमारे 20 सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले होते.
ADVERTISEMENT
माफी मागून समाधान होत असेल तर माफी मागतो – क्रीडामंत्री सुनील केदार
ADVERTISEMENT
महापारेषणला येथे काम सुरू करण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न विचारून त्यांच्यासह इतर चौघांनी खुबाळकर व कंत्राटदाराच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून अचानक मारहाण सुरू केली. पुन्हा या भागात काम करताना दिसल्यास तुमचे तुकडे करून घरी पाठवू, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप सुनील केदार यांच्यावर करण्यात आला होता.
या प्रकरणात सावनेर पोलिसांनी सुनील केदार यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. यानंतर आता सर्व साक्षीदार व पुरावे तपासत न्यायालयाने माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जो सुनील केदार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT