गडचिरोली: प्रियंका गांधी पहिल्यांदाच येणार गडचिरोलीत, ‘हे’ आहे कारण
व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या 14 डिसेंबर रोजी गडचिरोली येथे येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात प्रियंका गांधी यांची सभा देखील होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांनी याआधी ‘मै लडकी हू, लड सकती हू’ असा नारा […]
ADVERTISEMENT
व्यंकटेश दुडुमवार, गडचिरोली: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या 14 डिसेंबर रोजी गडचिरोली येथे येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात प्रियंका गांधी यांची सभा देखील होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
प्रियंका गांधी यांनी याआधी ‘मै लडकी हू, लड सकती हू’ असा नारा दिला होता. महिलांच्या मजबुतीसाठी आणि त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात सातत्याने प्रियांका गांधी रस्त्यावर उतरून काम करताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील महिला आणि युवतींसोबत त्या संवाद साधणार आहेत.
गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठे उद्योग धंदे नाहीत. त्यामुले हाताला काम नसल्याने अनेक कुटुंब हे अत्यंत बिकट परिस्थितीत आपलं जीवन व्यतित करत आहेत. हलाखीच्या परिस्थितीमुळे अजूनही काही मुली महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत नाहीत.
हे वाचलं का?
अशा परिस्थितीत जिल्ह्यातील विद्यार्थिनींची अडचण दूर व्हावी त्यांना शिक्षणात आवड निर्माण व्हावी म्हणून दहा हजार विद्यार्थिनींना प्रत्येकी 14 हजार रुपयाची इलेक्ट्रिक सायकल सीएसआर फंडातून वितरित केली जाणार आहे.
प्रियंका गांधी यांच्या सभेची पूर्वतयारी म्हणून राज्याचे मदत, पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिवाजी महाविद्यालयात जाऊन पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि आदी पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
ADVERTISEMENT
‘मोदीजी हा व्हीडिओ पाहिलात का?’,’तो’ व्हायरल VIDEO दाखवत प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
ADVERTISEMENT
पाहा प्रियंका गांधींच्या गडचिरोली दौऱ्याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काय दिली माहिती
‘गडचिरोली हा आदिवासी, नक्षलग्रस्त आणि अतिशय दुर्गम जिल्हा म्हणून परिचित आहे. या जिल्ह्यात प्रियंका गांधी या पहिल्यांदाच येणार आहेत. आम्ही सर्व जिल्हावासिय त्यांच्या स्वागताला तयार आहोत. प्रति इंदिरा.. असं म्हणून संपूर्ण देश त्यांच्याकडे पाहतो आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सातत्याने प्रियंका गांधी या रस्त्यावर उतरुन काम करतात.’
‘दरम्यान, गडचिरोलीमधील दुर्गम भागात राहणाऱ्या शाळेत जाणाऱ्या आठवी ते ग्रॅज्युएशनपर्यंत शिकणाऱ्या मुली यांना कोणत्याही सुविधा नव्हत्या. म्हणून इलेक्ट्रिक सायकलचं वितरण या मुलींसाठी करण्यात येणार आहे. यासाठी अनेक कंपन्यांनी आम्हाला मदत केली आहे. याच्याच वितरणाचं काम हे येत्या 14 डिसेंबरला होणार आहे. हा अजिबात राजकीय कार्यक्रम नाही. हा मुलींसाठी एक आगळावेगळा कार्यक्रम आहे.’ असं विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT