काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीचा आज निकाल : मल्लिकार्जून खरगे की शशी थरूर, कोण जिंकणार?
देशातला सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ला आज नवा अध्यक्ष मिळेल. यावेळी निवडून येणाऱ्या अध्यक्षाबद्दलची महत्त्वाची बाब म्हणजे २४ वर्षानंतर पहिल्यांदा काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेर व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळणार आहे. यापूर्वी सीताराम केसरी हे गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती अध्यक्ष बनले होते. आता मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर निवडणूक लढवत असून, कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष […]
ADVERTISEMENT

देशातला सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ला आज नवा अध्यक्ष मिळेल. यावेळी निवडून येणाऱ्या अध्यक्षाबद्दलची महत्त्वाची बाब म्हणजे २४ वर्षानंतर पहिल्यांदा काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेर व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळणार आहे. यापूर्वी सीताराम केसरी हे गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती अध्यक्ष बनले होते. आता मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर निवडणूक लढवत असून, कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोघांमध्ये लढत होत असून, अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ९,९१५ हजार मतदारांपैकी ९,५०० निवडणूक मंडळाच्या सदस्यांनी मतदान केलं आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज (१९ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता काँग्रेसच्या मुख्यालयात सुरूवात होणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा निवडणूक होत आहे.
देशातल्या ६८ मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर सीलबंद मतपेट्या काँग्रेसच्या मुख्यालयातील स्ट्रॉंग रुममध्ये नेण्यात आल्या. या मतपेट्या उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर उघडल्या जाणार आहेत.