मोदी खरं बोलले, ते कुणाचीच माफी मागणार नाहीत; गिरीश बापट यांचं विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. काँग्रेसने कोरोनाच्या काळात मजुरांना परत पाठवून उत्तर प्रदेशात कोरोना पसरवला, असं मोदी म्हणाले होते. या विधानावरून काँग्रेसकडून माफीची मागणी केली जात असतानाच भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी मोदी कुणाचीच माफी मागणार नाही, असं म्हटलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना […]
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. काँग्रेसने कोरोनाच्या काळात मजुरांना परत पाठवून उत्तर प्रदेशात कोरोना पसरवला, असं मोदी म्हणाले होते. या विधानावरून काँग्रेसकडून माफीची मागणी केली जात असतानाच भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी मोदी कुणाचीच माफी मागणार नाही, असं म्हटलं आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या कामावर मोदींनी निशाणा साधला. काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोरोना काळात मुंबईतील रेल्वे स्टेशनवर कामगारांना मोफत तिकीटं वाटली आणि त्यांना परत पाठवलं. कामगारांना परत पाठवून उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये कोरोना पसरवला, असा आरोप मोदींनी केला.
वांद्रे स्थानकावर मजुरांची गर्दी काँग्रेसने जमवली होती?; पोलिसांनी कुणाला केली होती अटक?
पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. केलेल्या विधानाबद्दल मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. या मागणीसाठी राज्यभर आंदोलनंही केली जात आहे. पुणे काँग्रेसकडून आज भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी गिरीश बापट यांच्या घराबाहेर भाजपचेही नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.