कोरोनामुक्त गावाला मिळणार 50 लाखांचं बक्षीस, ठाकरे सरकारने आणली खास योजना
राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. गाव पातळीवर प्रयत्न करून गावाला कोरोना मुक्त ठेवणाऱ्या ग्रामपंचायतींना पन्नास लाख रुपयांचे बक्षीस देण्याची योजना आणली आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येणार आहे या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला 50 लाख रुपये. दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीला 15 […]
ADVERTISEMENT

राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. गाव पातळीवर प्रयत्न करून गावाला कोरोना मुक्त ठेवणाऱ्या ग्रामपंचायतींना पन्नास लाख रुपयांचे बक्षीस देण्याची योजना आणली आहे.
ग्रामविकास विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येणार आहे
या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला 50 लाख रुपये. दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीला 15 लाख रुपये तर तिसरा नंबर मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीला दहा लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. यासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्यानंतर 2 जून 2021 रोजी झालेल्या बैठकीत ग्रामविकास विभागाच्या वतीने अशा पद्धतीची कोरोना मुक्त गाव योजना राबविण्यासाठी राज्य सरकारने अनुमती दिली होती.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे स्वयंमूल्यांकन करून याबाबतचा प्रस्ताव ंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांकडे सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा रुग्ण संख्येला अटकाव करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच गाव पुढारीमध्ये जनजागृती होऊन गावातल्या लोकांसाठी स्वयंप्रेरणेने सहभाग घ्यावा या उद्देशाने योजना पुढे आणली आहे. या बक्षिसाच्या रकमेतून गावाला विकास निधी देखील मिळणार आहे.