लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झाला म्हणजे तुम्ही घेतलेला पहिला डोस वाया गेला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसीविषयी (corona vaccine) सध्या भारतातील नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अशावेळी लसीकरणाबाबत (Vaccination) एक प्रश्न सातत्याने विचारला जात आहे की, जर पहिला डोस घेतला आणि तरीही कोरोनाची (Corona) लागण झाली तर पहिल्या डोसचा काहीच उपयोग नाही का? हा डोस वायाच गेला का? याचविषयी ‘मुंबई तक’ने डॉ. रवी गोडसे (Dr. Ravi Godse) यांना देखील प्रश्न विचारले. ज्याबाबत त्यांनी अतिशय इंटरेस्टिंग उत्तरं दिली आहेत.

लसीचा पहिला डोस घेऊनही कोरोनाची लागण झाली म्हणजे माझा पहिला डोस फुकट गेला का? असा प्रश्न अनेक जण विचारत आहे. जाणून घ्या याचं नेमकं उत्तर:

‘लसीचा पहिला डोस झाल्यानंतरही जर तुम्हाला कोरोनाची लागण झाली असेल तर दुसऱ्या डोससाठी थांबा. म्हणजे संसर्ग झाल्यापासून तीन महिने थांबा. त्यामुळे तुम्हाला कोरोनाची लागण झाली असली तरीही तुमचा पहिला डोस हा काही वाया गेलेला नाही.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘फ्रान्सचं तर असं म्हणणं आहे की, पहिला डोस घेतला आणि तुम्हाला कोरोना झाला तर त्यापुढे तुम्हाला आणखी कोणताही डोस घ्यायची गरज नाही. फ्रान्स म्हणतंय तुमचा कोरोनाचा संसर्ग हा एक डोस धरायचा आणि तुम्हाला जो पहिला डोस मिळाला होता तो आणखी एक डोस धरायचा.’

‘कसं असतं ना यामध्ये दुसऱ्या डोस नेमका घ्यायचा कशाला? तर दुसऱ्या डोसमध्ये पहिल्या डोसची जी इम्युनिटी असते त्याला बूस्ट मिळतं. म्हणजे ती चालना चालत राहते. त्यामुळे ९० दिवस तर आपलं नक्कीच संरक्षण होत आहे कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसपासून. तर दुसऱ्या डोसमुळे चालना मिळते. सर्वात महत्त्वाचं तुम्ही अशी चिंता करु नका की तुमचा दुसरा डोस हुकेल.’

ADVERTISEMENT

‘पहिला डोस घेतल्यानंतर बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पण असं असेल तर सरळ तीन महिने थांबा. त्यात तीन महिने थांबून तुमचं काहीही नुकसान होत नाही. इंग्लंडमध्ये जी मेक्स आणि मॅक्स स्टडी सुरु झाली आहे. त्यात कदाचित असं म्हणू की, पहिला डोस कोव्हिशिल्डचा घेतला असेल तर दुसरा फायझर आणि मॉडर्नाचा घेतला तरी चालेल. त्याविषयी आपल्याला एका महिन्यात काय ते समजेलच. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तीन महिने थांबलात तरी हरकत नाही. काही घाबरु नका.’ असं डॉ. रवी गोडसे यांनी उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

त्यामुळे लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर देखील तुम्हाला कोरोनाची लागण झाली तर घाबरु नका. त्यातून पूर्णपणे बरे झाल्यावर तीन महिन्याच्या कालावधीने आपण दुसरी लस घेऊ शकता.

कोरोनावरील लस घेतल्याने नेमकं काय होतं? जाणून घ्या सरळसोप्या भाषेत

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर जर दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर काय होईल? या प्रश्नाबाबत देखील डॉ. रवी गोडसे यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.

‘पुन्हा लसीचा पहिला डोस घेण्याची गरज नाही. कोव्हिशिल्डचा दुसरा डोस जेवढा लांबणीवर पडतोय तेवढा त्याचा फायदा होतोय असं दिसून आलं आहे. काही-काही वयोगटामध्ये. कोव्हिशिल्डचे दोन डोस तुम्ही चार आठवड्याने घेतले तर प्रभाव 55.1 आहे. आणि 8 ते 12 आठवड्याने घेतले तर 81.3 आहे. त्यामुळे जेवढा दुसरा डोस लांबणीवर पडतोय तेवढा त्याचा प्रभाव देखील वाढतो आहे काही-काही वयोगटामध्ये. त्यामुळे जर तुम्ही कोव्हिशिल्डचा एक डोस घेतला असेल तर आणि त्याच्यानंतर तुम्ही तीन महिन्यापर्यंत थांबला तरी चालेल.’

कोरोना, काळजी आणि लसीकरण तुमच्या मनातल्या प्रश्नांना डॉ. रवि गोडसेंनी दिली आहेत उत्तरं

‘कारण तुम्हाला जे संरक्षण 21 दिवसांनी मिळतं ते 90 दिवस टिकतं. आता जर तुम्ही लोकांना सांगितलं की, डोसेस नाहीत म्हणून तुम्ही तुमचा डोस लांबणीवर टाका तर लोकं वैतागणार. हेच त्यांना आधी सांगितलं की, जेवढा तुमचा डोस लांबणीवर पडेल तेवढा त्याचा प्रभाव क्षमता अधिक टिकून राहील.’

‘कोव्हॅक्सिनचा डोस हा चार आठवड्याने घेतला पाहिजे. इंग्लंडने कसं केलं सगळ्याच व्हॅक्सिनमधील फरक तीन महिने केला. ते खरं तर चुकीचं होतं फायझरकरता. पण आता आपल्याला दुसरा काही पर्यायही नाही. त्यामुळे पुन्हा पहिल्यापासून व्हॅक्सिन घेण्याची गरज नाही. त्यामुळे पाच आठवडे व्हॅक्सिन पुढे गेलं तरी त्याने काही फार फरक पडणार नाही. कोव्हॅक्सिनबाबत एवढं माहिती नाही. पण कोव्हिशिल्ड तुमचं तीन महिन्यापर्यंत पुढे गेलं तरी फार काही चिंता करु नका. काही घाबरु नका.’ अशी माहिती डॉ. रवी गोडसे यांनी दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT