जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांना दुसऱ्या पत्नीकडून होत होती मारहाण, नर्सने केला धक्कादायक खुलासा
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी एक ओळ लिहिली होती ज्यात ते म्हणाले होते की ब्रह्मांडात डोकावता येणं शक्य आहे पण कोणत्याही स्त्रीच्या मनात डोकावणं कठीण. त्यांना नेमकं काय छळत होतं? नेमक्या कोणत्या उद्विग्नतेतून त्यांनी ही ओळ लिहिली होती. व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडात काय चाललं आहे ते पाहू शकणारे स्टिफन एका महिलेच्या अत्याचाऱ्यापुढे हतबल झाले होते. हा […]
ADVERTISEMENT

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी एक ओळ लिहिली होती ज्यात ते म्हणाले होते की ब्रह्मांडात डोकावता येणं शक्य आहे पण कोणत्याही स्त्रीच्या मनात डोकावणं कठीण. त्यांना नेमकं काय छळत होतं? नेमक्या कोणत्या उद्विग्नतेतून त्यांनी ही ओळ लिहिली होती. व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडात काय चाललं आहे ते पाहू शकणारे स्टिफन एका महिलेच्या अत्याचाऱ्यापुढे हतबल झाले होते.
हा किस्सा रंजक आहे पण त्याहीपेक्षा इतक्या मोठ्या शास्त्रज्ञाच्या बाबतीतही असं घडू शकतं हा प्रश्न पाडणारा आहे. जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ असा लौकिक असलेल्या स्टिफन हॉकिंग यांना त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडून शारिरीक आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता ही बाब खूप कमी लोकांना ठाऊक आहे. दुसऱ्या पत्नीकडून अन्याय होऊनही स्टिफन हॉकिंग यांनी कधीही तिच्याबद्दल तक्रार केली नाही. तिला कोणतीही शिक्षाही दिली नाही. 2006 मध्ये या दोघांनीही सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
1990 च्या दशकात स्टिफन हॉकिंग आणि जेन हॉकिंग यांचा पहिला घटस्फोट झाला. त्याचीही चर्चा झाली होती. जेन यांना संशय घेण्याची सवय होती. त्यामुळे स्टिफन आणि जेन यांनी 90 च्या दशकात वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जेन तिच्या तीन मुलांना घेऊन स्टिफन यांना सोडून निघून गेली. या घटनेच्या पाच वर्षांनंतर स्टिफन हॉकिंग यांनी दुसरं लग्न केलं. त्यांनी हे लग्न त्यांची देखभाल करणारी नर्स एलेन मेसॉनसोबत केलं. एलेनचंही हे दुसरं लग्न होतं. तिचा पहिला नवरा डेव्हिड मेसॉन हा इंजिनिअर होता. तो स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर मध्ये असलेल्या स्पीच सिंथसायजर या मशीनच्या देखभालीचंही काम करत होता. या स्पिच सिंथसायजरमुळेच स्टिफन हे जगाशी संवाद साधू शकत होते.