दादा भुसेंनी बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोराला केसांना ओढत बाहेर काढलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नाशिकचे पालकमंत्री राज्याचे कॅबिनेटमंत्री दादा भूसे यांनी पिस्टल घेऊन घरात घुसणाऱ्या दरोडेखोराला केसाला धरुन बंगल्याबाहेर ओढत आणलं. हा सगळा प्रकार सोमवारी दुपारी घडला. कलेक्टर पट्टा भागातील एका बंगल्यात पिस्टल घेऊन एक दरोडेखोर घुसला होता. या दरम्यान त्यानं बंगल्यातील तीन महिलांना पिस्टलचा धाक दाखवून सोनं लुटण्याचा प्रयत्न केला असं कळतंय. या दरम्यान घटनास्थळी थेट नाशिकचे पालकमंत्री यांची एन्ट्री झाली. इतर नागरिकांच्या मदतीने बंगल्यात घुसलेल्या या दरोडेखोराला पोलिसाच्या ताब्यात देण्यात आलं. कृष्णा अन्ना पवार असं या आरोपीचं नाव आहे.

ADVERTISEMENT

दादा भुसे संतापले

बंदुकीच्या धाकानं लुटायचा प्रयत्न करण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोरावर संतापून दादा भुसे यांच्यासह इतर नागरिक बंगल्यात गेले. या दरम्यान दरोड्याच्या उद्देशानं बंगल्यात घुसलेल्या व्यक्तीला काहींनी पकडून खाली आणलं. यावेळी मध्येच थांबवून मंत्री महोदयांनी त्याला तुझ्यासोबत आणखी कोण होते, तुझ्या साथीदारांचे नावं सांग, असा सवाल केला. माझ्यासोबत कोणी नव्हतं मी एकटाच होतो, असं उत्तर देताच जास्त महाग पडेल असं म्हणत दादा भुसे संतापले आणि त्याच्या केसांना ओढत त्याला खाली आणलं. या दरम्यान अनेकांनी मंत्री महोदयांसमोरच त्या व्याक्तीला चांगलाच चोप दिला.

”…नाहीतर आपल्यावरच ३०२ चा गुन्हा दाखल होईल” : दादा भुसे

दरम्यान या सगळ्या घटनाक्रमाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दादा भुसे तावातावानं बंगल्यात घुसत आहेत. यावेळी काही संतप्त नागरिक देखील त्यांच्यासोबत बंगल्यात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेचं गाभिंर्य लक्षात घेऊन दादा भुसे यांनी नागरिकांना शांत केलं. ते म्हणाले, बाकी सगळं बाजुला राहील आणि आपल्यावरच ३०२ चा गुन्हा दाखल होईल, त्यामुळे तुम्ही सगळे शांत व्हा. एकजण म्हणाला लेडीजला आतमध्ये मारलय साहेब. असं म्हणताच, मी असंच सोडणार आहे का? असं ओरडून दादा भुसे म्हणाले आणि सगळ्यांना तिथेच थांबवलं.

हे वाचलं का?

या दरोडेखोराला उपस्थित काही लोकांनी ओळखल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. ‘अरे हा आहे का? याला सगळं माहित आहे, असं म्हणताना काहीजण व्हिडिओत दिसत आहेत. आता हा व्यक्ती कोण होता? त्याची पार्श्वभूमी काय आहे, य़ाबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. पोलिस या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT