पुण्यात स्वयंपाक बनवण्यावरून वाद, सुनेने ७१ वर्षीय सासूचा गळा आवळून केला खून
स्वयंपाक बनवण्यावरून वाद झाल्यानंतर सुनेने ७१ वर्षीय सासूचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातल्या चाकणमध्ये घडली आहे. यानंतर पोलिसांनी या सुनेला अटक केली आहे. सुषमा अशोक मुळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या ७१ वर्षाच्या होत्या. तर सुवर्णा सागर मुळे असं अटक करण्यात आलेल्या सुनेचं नाव आहे. नाशिकमध्ये मुस्लीम […]
ADVERTISEMENT
स्वयंपाक बनवण्यावरून वाद झाल्यानंतर सुनेने ७१ वर्षीय सासूचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातल्या चाकणमध्ये घडली आहे. यानंतर पोलिसांनी या सुनेला अटक केली आहे. सुषमा अशोक मुळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या ७१ वर्षाच्या होत्या. तर सुवर्णा सागर मुळे असं अटक करण्यात आलेल्या सुनेचं नाव आहे.
ADVERTISEMENT
नाशिकमध्ये मुस्लीम धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या, Youtubeवरती 2 लाख फॉलोअर्स
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासू सुषमा, आरोपी सुन सुवर्णा आणि तिचा पती हे सगळे एकत्र राहात होते. सासू सुषमा आणि सुन सुवर्णा यांच्यात नेहमी वाद होत असत. सुवर्णाला तीन वर्षांचा मुलगा आहे. मुलाला सासूकडे सोपवून सुवर्णा शेजारी जाऊन गप्पा मारत बसत असे. या मुद्द्यावरून या दोघींमध्ये बऱ्याचदा खटके उडत होते. सुषमा मुळे यांना फिट येणं, शुगर आणि रक्तदाबाचा त्रास होता. सुवर्णाचा पती कामावर गेला होता. त्यानंतर स्वयंपाक तयार करण्यावरून या दोघींमध्ये वाद झाला. सुवर्णाने सासू सुषमाचा गळा नायलॉनच्या दोरीने आवळला.
हे वाचलं का?
पुणे: जेलरच्या मुलाची निर्घृण हत्या, तरुणीने केले कोयत्याने सपासप वार
सासू बेशुद्ध झाल्याचं पाहून सुवर्णाने तिच्या पतीला बोलवून घेतलं. आईला फिट आली आणि त्या बेशुद्ध झाल्या असं सुवर्णाने तिच्या पतीला सांगितलं. त्यानंतर सुषमा मुळे यांना रूग्णालयात नेण्यात आलं. तिथे सुषमा मुळे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. डॉक्टरांना या प्रकरणाबाबत संशय आला त्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन केला.
ADVERTISEMENT
पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. त्यानंतर सुनेकडे नेमकं काय घडलं याची चौकशी केली. सुरूवातीला सुवर्णा मुळे या माझ्या सासूबाई फिट येऊन बेशुद्ध झाल्या एवढंच सांगत होत्या. मात्र सुषमा मुळे यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्या अहवालात सुषमा मुळे यांचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याची माहिती समोर आली. यानंतर सुषमा मुळे यांची सुन सुवर्णा मुळेला पोलिसांनी अटक केली.
ADVERTISEMENT
पोलीस उप निरीक्षक विनोद शेंडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या सगळ्या प्रकराचा सुषमा यांचा मुलगा सागरला धक्का बसला आहे. सासू-सुनेची विकोपाला जाणारी भांडणं कुठल्या थराला जाऊ शकतात हेच या घटनेवरून समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT