‘भरत गोगावले आमच्या गटाचे प्रतोद, त्यामुळे…’; दीपक केसरकर संजय राठोड, बच्चू कडू काय बोलले?
मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज हे सर्व कॅबिनेट मंत्री मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळि गेले होते. या मंत्र्यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी दीपक केसरकर यांनी संजय राठोड, बच्चू कडू आणि भरत गोगावले यांच्याबद्दल भाष्य केलं. माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले, “मंत्रिपदाची शपथ घेतली असली, […]
ADVERTISEMENT

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज हे सर्व कॅबिनेट मंत्री मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळि गेले होते. या मंत्र्यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी दीपक केसरकर यांनी संजय राठोड, बच्चू कडू आणि भरत गोगावले यांच्याबद्दल भाष्य केलं.
माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले, “मंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी मंत्रालयाचा कार्यभार कार्यालयात जाऊन स्वीकारायचा असतो. आमच्या कार्यालयांचं वितरण झालेलं नाही. वितरण झाल्यानंतर आम्हाला जी कार्यालये दिली जातील, त्याचा कार्यभार स्वीकारू. कार्यभार स्वीकारण्यापूर्वी बाळासाहेबांचं दर्शन घेत आवश्यक होतं, कारण त्यांच्या प्रेरणेनं महाराष्ट्राचा विकास करायचा आहे.”
मुख्यमंत्र्यांनी पदाचा कार्यभार घेतला, त्यावेळी फक्त मुख्यमंत्रीच नाही, तर ५० आमदारही पावसात भिजत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आलो होतो. त्यांचे आशीर्वाद घेतले होते. त्यांच्या प्रेरणेने आम्हीच नाही, तर आमच्यासोबत असलेला भाजपही त्यांच्या विचार घेऊन काम करेल”, अशी अपेक्षा दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
संजय राठोडांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर दीपक केसरकरांचा खुलासा
“संजय राठोडांवर कोणताही दोष सिद्ध झालेला नाही. त्यामुळे अशा परिस्थिती त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून किती काळ वंचित ठेवणार. ते एका मागासलेल्या समाजाचं, भटक्या समाजाचं ते प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या समाजाचीही मागणी होती की, त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नसेल, तर तुम्ही आमच्या समाजावर अन्याय करत आहात.”