Shraddha Murder Case : 10 तासांत श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताबने बिअर घेतली अन्…
चित्रपटाची पटकथा वाटावी, असाच क्रूर प्रकार श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात घडलाय. लिव्ह-इन पार्टनर असलेल्या आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली. मात्र, त्यानंतर त्याने केलेलं कृत्ये समोर आल्यानंतर दिल्ली हादरली. याच प्रकरणात आणखी एक हादरवून टाकणारी माहिती समोर आलीये. आफताब पूनावालाने 18 मे रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली. […]
ADVERTISEMENT

चित्रपटाची पटकथा वाटावी, असाच क्रूर प्रकार श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात घडलाय. लिव्ह-इन पार्टनर असलेल्या आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली. मात्र, त्यानंतर त्याने केलेलं कृत्ये समोर आल्यानंतर दिल्ली हादरली. याच प्रकरणात आणखी एक हादरवून टाकणारी माहिती समोर आलीये.
आफताब पूनावालाने 18 मे रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली. त्यानं चौकशीत दिलेल्या माहितीनुसार त्यांचे लग्न करण्यावरून वाद सुरू होते. त्या वादातून तिची हत्या केली. मात्र, हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी आफताब पूनावालानं केलेलं कृत्य समोर आल्यानंतर पोलीस हादरले.
चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार आफताब पूनावालाने फ्लॅटवर श्रद्धा वालकरची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबला तब्बल दहा तास लागले.
Shraddha Murder Case : “श्रद्धाचं फ्रीजमध्ये ठेवलेलं शीर दररोज पाहायचो” ऐकून पोलिसही हादरले