Omicron Variant : महाराष्ट्रापाठोपाठ ओमिक्रॉननं दिल्लीतही ठेवलं पाऊल; देशातील 5वा रुग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संसर्गाचा प्रचंड वेग असलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. सर्वत्र खबरदारी घेतली जात असून, भारतातही प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच जोखमीच्या देशांसह इतर राष्ट्रांतून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. असं असतानाच भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पाचव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत आलेल्या एका प्रवाशाला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं असून, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी ही माहिती दिली.

ADVERTISEMENT

राजधानी दिल्लीत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेला पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी याची माहिती दिली. आणखी एक रुग्ण आढळून आल्यामुळे देशातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 5 झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचं निदान झालेला हा रुग्ण टांझानियातून भारतात आला आहे. त्याला आता लोक नायक जय प्रकाश नारायण रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

‘आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 17 रुग्णांना लोक नायक जय प्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी 12 जणांचे जिनोम सिक्वेन्सिगही झालं आहे. त्या 12 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेला असल्याचं निष्पन्न झालं आहे,’ अशी माहिती आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी दिली.

हे वाचलं का?

Omicron: मोठी बातमी.. महाराष्ट्रातही झाली ओमिक्रॉनची एंट्री, ‘या’ शहरात सापडला पहिला रुग्ण

ओमिक्रॉन संक्रमित रुग्णाबद्दल माहिती देत असतानाच जैन यांनी या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झालेल्या देशांतून येणारी विमान थांबवायला हवीत, अशी मागणीही केंद्राकडे केली आहे.

ADVERTISEMENT

जोखमीच्या (हाय रिस्क) देशांसह इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने नियमावली निश्चित केली आहे. सर्वच विमानतळांवर याची अमलबजावणी केली जात असून, आतापर्यंत देशात 5 ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत.

ADVERTISEMENT

Omicron Variant : ओमिक्रॉनचं महाराष्ट्रात पाऊल; आरोग्यमंत्र्यांनी लोकांच्या मनातील भीती केली दूर

सर्वात आधी गेल्या आठवड्यात कर्नाटकात दोन रुग्ण आढळून आले. त्यानंतर शनिवारी (4 डिसेंबर) गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. त्यानंतर आता दिल्लीतही एका कोरोना रुग्णाला ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं निदान जिनोम सिक्वेन्सिगमधून झालं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT